पार्टीमध्ये अर्जुनने मलायकासोबत असं काय केलं? अभिनेत्याच्या बहिणी पाहातच राहिल्या

बहिणी आणि कुटुंबासमोर अर्जुनने पार केल्या सर्व मर्यादा, मलायाकासोबतचा 'तो' व्हिडीओ होतोय सर्वत्र व्हायरल  

Updated: Aug 27, 2022, 08:46 AM IST
पार्टीमध्ये अर्जुनने मलायकासोबत असं काय केलं? अभिनेत्याच्या बहिणी पाहातच राहिल्या title=

मुंबई : अभिनेत्री अर्जुन कपूर  आणि अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एवढच नाही तर, दोघांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार देखील सर्वांसमोर केला. दोघे कायम सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता देखील मलायका आणि अर्जुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अर्जुन आणि मलायका प्रचंड आनंदी दिसत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला दोघांचा व्हिडीओ डिझायनर अर्पित मेहता आणि कुनाल रावल यांच्या लग्ना दरम्यानचा आहे. 

डिझायनर अर्पित मेहता  आणि  कुनाल रावल लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. नुकताच त्यांनी लग्नापूर्वी एका पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींना हजेरी लावली. पण अर्जुन आणि मलायकाच्या जोडीने सर्वांच्या नजरा वेधल्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पार्टीमध्ये दोघांना जबरदस्त डान्स देखील केला. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अर्जुन मलायका अभिनेत्रीच्या थ्रोबॅक सुपरहिट 'छैया-छैया' गाण्यावर नाचताना दिसत आहे. 

यावेळी अर्जनने कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता मलायकासोबत जोरदार डान्स केला. या पार्टीत अर्जुनच्या बहिणी अंशुला कपूर, जाह्नवी कपूर, शनया कपूर काका-काकी  संजय कपूर महीप कपूर आणि अनिल कपूर देखील उपस्थित होते.