रियालिटी शोमुळे विजेते मालामाल, अर्जुन बिजलानी ते पवनदीप राजनच्या संपत्तीत मोठी वाढ

रियालिटी शोमुळे छोट्या शहरातील कलाकारांनी मुंबईत मिळवली संपंत्ती आणि प्रसिद्धी 

Updated: Sep 30, 2021, 07:13 AM IST
रियालिटी शोमुळे विजेते मालामाल, अर्जुन बिजलानी ते पवनदीप राजनच्या संपत्तीत मोठी वाढ  title=

मुंबई : आज पाहायला गेलं तर मालिकांपेक्षा रियालिटी शोला अधिक प्रसिद्धी मिळते. सिंगिग, डान्सिंग आणि बिग बॉसने तर चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. एवढंच नाही तर 'खतरों के खिलाडी'ने सर्वांची हिंमत वाढवली. रियालिटी शोमुळे देशभरातून आलेल्या कलाकारांना एक स्टेज तर मिळाला पण त्यांना त्याच्या आयुष्याचा मार्ग देखील सापडला. अनेक स्पर्धकांना रियालिटी शोमुळे फक्त प्रसिद्धी नाही तर पैसे देखील मिळाले. अभिनेता अर्जुन बिजलानी पासून ते पवनदीप राजन पर्यंत स्पर्धकांना विजय मिळाल्यानंतर पुरस्कार आणि रक्कम देखील मिळाली...

अर्जुन बिजलानी

khatron ke khiladi winner : अर्जुन बिजलानीने मारली बाजी, ट्रॉफी सह जिंकली मोठी रक्कम

'खतरों के खिलाडी 11' शोचं विजेतेपद अभिनेता अर्जुन बिजलानीच्या वाट्यात आलं. विजयी घोषित झाल्यानंतर त्याला 20 लाख रूपयांसोबतचं एक ब्रँड न्यू मारूती स्विफ्ट कार मिळाली.

अभिनेत्री दिव्या अग्रवाल
'बिग बॉस ओटीटी' चा अवॉर्ड दिव्या अग्रवालला मिळाला. दिव्याला रियालिटी शोची क्विन म्हणून देखील संबोधलं जातं. 'बिग बॉस ओटीटी' ची  विनर घोषित झाल्यानंतर दिव्याला 25 लाख रूपये मिळाले. 

पवनदीप राजन

Indian Idol 12 : पवनदीप राजन विजेता घोषित झाल्यानंतर अरूणिताबद्दल म्हणाला...

पवनदीप राजनच्या चाहत्यांची संख्या आज कमी नाही. 'इंडियन आयडल 13' चा विनर घोषित झाल्यानंतर त्याला 25 लाख रूपयांसोबतचं एक ब्रँड न्यू मारूती स्विफ्ट कार मिळाली.

प्रिंस नरूला आणि युविका चौधरी

युविका चौधरीच्या हातावर लागली प्रिन्स नरूलाच्या नावाची मेंहदी

सेलिब्रिटी कपल प्रिंस नरूला आणि युविका चौधरी यांनी 'नच बलिए 9' मध्ये भाग घेतला आहे. शोमध्ये दोघांच्या केमिस्ट्रीने अनेकांना कपल गोल दिले. उत्तम डान्स कौशल्यामुळे त्यांना 50 लाख रूपये मिळाले होते.