मुंबई : लोकप्रिय गायक अरिजित सिंह (Arijit Singh) च्या आईचं कोलकातामधील एका रूग्णालयात निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. रूग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. कुटुंबाने त्यांचं पार्थिव शरीर मुर्शिदाबाद येथे नेलं आहे.
Rip @Arijit_Singh 's mother passed away . She was diagnosed with Covid. She was in need of negative blood donor . But she couldn't get.
Rip pic.twitter.com/unkuHKTXoh— Shubham Tiger Rana (@TheGreatRana2) May 20, 2021
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अरिजीतच्या आईला ए निगेटिव्ह रक्ताची गरज होती. अभिनेत्री स्वास्तिका मुखर्जीने सोशल मीडियावर याबाबत माहिती देऊन गरज असल्याचं म्हटलं होतं. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की,'अरिजीतच्या आईला ए निगेटिव्ह रक्ताची गरज आहे. त्या कोलकातामधील AMRI ढाकुरिया रूग्णालयात दाखल होत्या. त्याचप्रमाणे तिने हे देखील सांगितलं होतं की, ब्लड डोनर हा पुरूष असावा.'
#ArijitSingh#ArijitSingh's mother passes away due to #COVID19 complications
Rip arijit singh's mother pic.twitter.com/SJuvdjphch— Raghuveer Kuwal (@KuwalRaghuveer) May 20, 2021
तसेच ही पोस्ट दिग्दर्शक श्रीजीत यांनी बंगालीत कॉपी करून पोस्ट केली होती. अरिजीत सिंहने आपल्या आईच्या जाण्यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.