मलायका, अरबाजच्या मुलाचा बॉलिवूड डेब्यू

'दबंग ३' मधून अरबाज, मलायकाच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

Updated: Feb 13, 2019, 09:11 AM IST
मलायका, अरबाजच्या मुलाचा बॉलिवूड डेब्यू title=

मुंबई : बॉलिवूड भाईजान सलमान खानचा 'दबंग' तुफान गाजला. 'दबंग'च्या घवघवीत यशानंतर आलेला दबंगचा सिक्वलही चांगलाच लोकप्रिय ठरला. सिक्वलनंतर आता सात वर्षांनी दबंग ३ येण्याच्या मार्गावर आहे. दबंग चित्रपटाच्या दोन्ही भागात अरबाज, मलायका यांच्या भूमिका होत्या परंतु येत्या दबंग ३ मधून त्यांचा मुलगा अरहान खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. प्रभू देवा दिग्दर्शित दबंग ३ चित्रपटात अरहान सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे. 

आगामी दबंग ३ हा आधीच्या सिक्वलचा प्रिक्वल आहे. एप्रिल २०१९ पासून दबंग ३ चे चित्रिकरण सुरू होणार आहे. दबंगच्या पहिल्या दोन सिरीजप्रमाणेच दबंग ३ मध्येही सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मात्र मलायका या चित्रपटात दिसणार नसून त्या जागी करीना कपूरला कास्ट केलं असण्याची शक्यता आहे.

 

 
 
 
 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial) on

२०१७ साली अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर मलायका खान आता अभिनेता अर्जुन कपूरसह रिलेशनशिपमध्ये आहे. अरबाज खानही गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत असून ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.