मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नानंतरचा सोहळा अजूनही सुरू आहे.
दिल्लीत आपल्या कुटुंबासाोबत आणि परिवारासोबत रिसेप्शन साजरं केल्यानंतर आता ही लोकप्रिय जोडी मुंबईत दाखल झाली आहे. मुंबईत आज बॉलिवूड आणि क्रिकेटमधील खास व्यक्तींसाठी आज विरूष्काने पार्टीचं आयोजन केलं आहे. या पार्टीसाठी विराट आणि अनुष्का मुंबईत दाखल झाले आहेत.
विराट आणि अनुष्का मुंबईतील हॉटेल हाईराइज सेंट रेजिसमध्ये पोहोचले आहेत. हे हॉटेल मुंबईतील लोअर परेल परिसरात आहेत. या हॉटेलच्या 9 व्या माळ्यावर एस्टर बालरूममध्ये या लग्नाची पार्टी आयोजित कऱण्यात आली आहे. आपल्या वेडिंग पार्टीत हे दोघे खास पद्धतीने तयार होणार आहेत. पण त्याअगोदर हे दोघे हॉटेलमध्ये अगदी कॅज्युअल लूकमध्ये दिसले. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.
विराट या लूकमध्ये ब्लॅक टीशर्ट आणि लोअरमध्ये दिसला. तर अनुष्का ब्लू कलरच्या जंपसूटमध्ये दिसली. या बरोबरच सगळ्यांच्या नजरा अनुष्काच्या चुड्यावर होत्या. या सिंपल पेहरावातही तिचा चुड्डा लक्ष वेधून घेत होता. तुम्ही देखील पाहा या दोघांचा वेडिंग पार्टी अगोदरचा लूक. या अगोदर 21 डिसेंबर रोजी दिल्लीतील लोकप्रिय हॉटेल ताजमध्ये विरूष्काचं रिसेप्शन झालं. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पोहोचले होते. या दोघांनी 11 डिसेंबर रोजी इटलीमध्ये खाजगीपद्धतीने लग्न केलं.