अंगावर काटा आणणारा 'परी'चा टीझर

'परी' हे नाव वाचलं की सहाजिकच तुम्हांला एखादी गोड, हळूवार परीकथा असेल असा अनेकांचा समज झाला असेल. पण अनुष्का शर्माच्या आगामी चित्रपटाचे नाव आणि त्याचा टीझर पाहिला तर तुमचा हा समज दूर होईल.  

Updated: Jan 10, 2018, 10:23 AM IST
अंगावर काटा आणणारा 'परी'चा टीझर   title=

मुंबई : 'परी' हे नाव वाचलं की सहाजिकच तुम्हांला एखादी गोड, हळूवार परीकथा असेल असा अनेकांचा समज झाला असेल. पण अनुष्का शर्माच्या आगामी चित्रपटाचे नाव आणि त्याचा टीझर पाहिला तर तुमचा हा समज दूर होईल.  

लग्नानंतर अनुष्का कामाला 

इटलीमध्ये लग्न, त्यापाठोपाठ दिल्ली, मुंबईमधील रिसेप्शन आणि त्यानंतर विराटसोबत दक्षिण आफ्रिकेला नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गेलेली अनुष्का शर्मा आता मुंबईत परतली आहे. 

मुंबईत परतल्यानंतर अनुष्का शर्माने कामाला सुरूवात केली आहे. शाहरूख खानसोबत अनुष्का 'ZERO' च्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली आहे. 

परीचा टीझर  

मंगळवारी रात्री अनुष्का शर्माने तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर रसिकांसोबत शेअर केला आहे. 'परी' हा अनुष्काचा आगामी चित्रपट आहे. 2 मार्चला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. 

 

Sweet dreams guys...... #HoliWithPari

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 

एकही डायलॉग नसलेला 'परी'चा पहिला टीझर अंगावर काटा आणणारा आहे. अवघ्या काही सेकंदामध्ये अनुष्काच्या चेहर्‍यावर बदलणार्‍या खूणा खूपच बोलक्या आहे. 

'परी' नॉट अ फेरीटेल अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना स्पेशल इफेक्ट्सची किमया पाहता येणार आहे.