वाढदिवसानिमित्त अनुष्काने स्वतःला दिले हे खास गिफ्ट...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा काल ३१ वा वाढदिवस होता.

Updated: May 2, 2018, 04:41 PM IST
वाढदिवसानिमित्त अनुष्काने स्वतःला दिले हे खास गिफ्ट...	 title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा काल ३१ वा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त ती स्वतःला एक खास गिफ्ट देणार आहे. अनुष्का पूर्वीपासूनच प्राण्यांसाठी काम करत आहे. तिचे प्राणीप्रेम सर्वश्रूत आहे. आणि याच प्रेमापोटी ती प्राण्यांसाठी एक शेल्टर होम बनवणार आहे. अनुष्का इंस्टाग्रामवरही अनेकदा प्राण्यांसोबतचे फोटोज शेअर करताना दिसते. नेहमीच आजारी, जखमी प्राण्यांसाठी एक आश्रय देताना दिसते. आता तिच्या या प्रयत्नांत पुढे जात ती अजून एक पाऊल उचलले आहे. प्राण्यांना शेल्टर होम बनवण्यासाठी अनुष्काने मुंबईच्या बाहेर जमिन खरेदी केली आहे.

तिच्यासाठी ही गोष्ट आहे खास

रिपोर्टनुसार, या जमीनीवर तिच्या वाढदिवसापासून काम सुरु करण्यात आले. प्राण्यांसाठी शेल्टर होम बनवण्याची तिची इच्छा फार पूर्वीपासूनची असून यावर ती गेल्या ३ वर्षांपासून काम करत आहे. पाळीव, जखमी, त्रासलेल्या प्राण्यांना सुरक्षित आणि पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची तिची इच्छा आहे. याबद्दल ती म्हणाली की, माझ्या वाढदिवसानिमित्त या कामाला सुरुवात होत आहे, ही खूप खास गोष्ट आहे.

या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला

लवकरच अनुष्का वरुण धवन सोबत सुई धागा तर शाहरुखसोबतच्या झीरो सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.