अनुपम खेर का म्हणाले, 'महेश भट्ट खूप मोठे फ्रॉड आहेत'

महेश भट्ट यांच्यामुळे अनुपम खेर यांनी घेतला होता मुंबई सोडण्याचा निर्णय

Updated: Aug 28, 2021, 10:47 PM IST
अनुपम खेर का म्हणाले, 'महेश भट्ट खूप मोठे फ्रॉड आहेत' title=

मुंबई : अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत सांगितलं  की, महेश भट्ट यांच्यामुळे मी निराश झालो होतो आणि त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला होता पण त्याआधी त्यांना महेश भट्ट यांना धडा शिकवायचा होता.अभिनेता अनुपम खेर यांनी 1984 मध्ये आलेल्या 'सारांश' या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला पण भूमिकेचं आश्वासन देऊनही ते जवळजवळ चित्रपटातून बाहेर फेकला गेले.

अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. अनुपम म्हणाले होते की, नकाराने जगण्याची इच्छाशक्ती मोडली होती. ते मुंबई सोडत होते पण त्यांना दिग्दर्शक महेश भट्ट यांना धडा शिकवायचा होता की ते त्यांच्यासाठी उभे राहिले नाहीत.

अनुपम खेर यांनी 2019 मध्ये दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता. अनुपम खेर म्हणाले, 'मी महेश भट्ट यांना भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं, मी ऐकलंय की, तुम्ही मंचावर खूप चांगलं काम करता, मग मी त्यांना सांगितलं, नाही तुम्ही चुकीचं ऐकलं की,. मी खूप छान करतो. हे उत्तर ऐकल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या चित्रपटात घेतलं.

चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधी, अनुपम खेर यांनी त्यांना चित्रपटातून वगळल्याची आणि त्यांच्याबदली संजीव कुमार यांना घेतल्याची बातमी ऐकली. 'मला भीती वाटली. मला वाटलं की हे शहर माझ्या लायकीचं नाही. मी माझं सामान घेतलं . 'आणि मी कायमचा मुंबई सोडणार होतो पण मुंबई सोडण्यापूर्वी मी महेश भट्ट यांच्या घरी गेलो. जेव्हा मी त्यांच्या घरी पोहोचलो, तेव्हा लिफ्ट काम करत नव्हती, म्हणून मी पायी गेलो. लोक म्हणतात जेव्हा तुम्ही रागावता, तेव्हा तुमच्याकडे खूप ताकद असते

मी बेल वाजवली आणि महेशजींनी दार उघडलं आणि म्हणाले, तु आलास हे चांगलं आहे. तुम्ही दुसरी भूमिका साकारणार आहात. तुम्हाला चित्रपट निर्मात्याचा दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल. संजीव कुमार ती भूमिका करत आहेत. तुमची भूमिका मोठी नाही पण तुमची भूमिका लक्षात येईल. मग मी त्यांना सांगितलं. मिस्टर भट्ट, खिडकीकडे या, ती माझी टॅक्सी आहे. माझं सामान त्यात आहे. मी हे शहर सोडत आहे पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही माझी सगळ्यात मोठी फसवणूक करत आहात.  तुम्हाला बनवायचा आहे खऱ्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा आहे पण तुमचा चित्रपट खरा नाही

जेव्हा अनुपम खेर आपल्या टॅक्सीमध्ये बसणार होते, तेव्हा महेश भट्ट यांनी त्यांना खिडकीतून हाक मारली आणि सांगितलं की ते निर्मात्याला फोन करून सांगणार आहेत की त्यांनी अलीकडेच 'सीन' पाहिला आहे आणि त्यांना खात्री आहे की भूमिका चांगली अनुपम खेर साकारु शकतात. अलिकडे अनुपम खेर यांनी त्यांचा 519 वा चित्रपट पूर्ण केला. ते बॉलिवूड आणि हॉलीवूडमध्ये सक्रिय आहेत.