कॅन्सरग्रस्त सोनालीला पाहून अनुपम खेर म्हणाले ...

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या हाय ग्रेड कॅन्सरशी सामना करत आहे. 

Updated: Aug 12, 2018, 03:34 PM IST
कॅन्सरग्रस्त सोनालीला पाहून अनुपम खेर म्हणाले ...  title=

अमेरिका : अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या हाय ग्रेड कॅन्सरशी सामना करत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सोनाली बेंद्रेने तिच्या कॅन्सरची माहिती आहे. अचानक धडकलेल्या या वृत्ताने सोनालीचे चाहते आणि सोबतीने बॉलिवूडही तिच्या आरोग्यामध्ये झपाट्याने सुधारणा व्हावी याकरिता प्रार्थना करत आहे. 

अमेरिकेत उपचार  

कॅन्सर या आजाराचं नाव ऐकूनच अनेकांचा थरकाप उडतो. मात्र सोनाली या आजाराशी सक्षमपणे सामना करत आहे सोबतच प्रत्येक क्षणांचा आनंद घेत, सकारात्मकता शोधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. 

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार, ऋतिक रोशन, सुझेन खान यांनी सोनालीची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची चौकशी केली.  मागील 15 दिवसांपासून अभिनेते अनुपम खेरदेखील सोनालीच्या सोबतीला असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

काही मोजक्या सिनेमात काम  केले असले तरीही मुंबईत अनेक अनौपचारिकरित्या भेटल्याचं अनुपम खेर यांनी सांगितले आहे. मात्र मागील 15 दिवसात मला भेटलेली सोनाली बेंद्रे ही ' माझा हिरो' असल्याचं त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये लिहले आहे. 

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने, मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते अगदी कॅन्सरच्या उपचारांपूर्वी हेअर कटिंगचा व्हिडिओदेखील सोनाली बेंद्रेने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.