जान्हवी, खुशीवर कमेंट्स करणाऱ्यांवर भडकली श्रीदेवीची सावत्र मुलगी

श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन आणि अंशुला कपूर यांनी वडिलांना जो काही भक्कम पाठिंबा दिला त्यावरुन त्यांचे सर्वत्र कौतुक केले जातेय.

Updated: Mar 5, 2018, 07:25 PM IST
जान्हवी, खुशीवर कमेंट्स करणाऱ्यांवर भडकली श्रीदेवीची सावत्र मुलगी title=

मुंबई : श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन आणि अंशुला कपूर यांनी वडिलांना जो काही भक्कम पाठिंबा दिला त्यावरुन त्यांचे सर्वत्र कौतुक केले जातेय.

इतकंच नव्हे तर अंशुला आणि अर्जुन कपूर नात्यातील कटुता दूर सारत जान्हवी आणि खुशीला आधार देतायत. नुकतीच अंशुलाने जान्हवी, खुशीवर वाईट कमेंट्स करणाऱ्यांना चपराक लगावली. 

डिलीट केली कमेंट

अंशुलाने सोशल मीडियाच्या अकाऊंटवर एक पोस्ट केलीये ज्यात प्रत्येक परिस्थितीला सामोरे जावे असे लिहिलेय. या पोस्टवर अर्जुन कपूरच्या एका फॅनने जान्हवी आणि खुशीबाबत अपशब्द वापरलेत. तसेच त्यांच्याबद्दल वाईट लिहिलेय. या कमेंटविरोधात अंशुलाने आपल्या सावत्र बहिणी आणि वडिलांना साथ देत या कमेंट्स डिलीट केल्यात.

अशा कमेंट्स सहन करणार नाही - अंशुला

अंशुलाने फॅन्सच्या या कमेंट डिलीट केल्यानंतर म्हटले, आपल्या बहिणींविरुद्ध अपशब्द वापरल्यास सहन करणार नाही. अंशुला पुढे म्हणाली, माझ्या बहिणींबाबत कोणीही वाईट बोलल्यास वा अपशब्द वापरल्यास याद राखा. मला हे अजिबात आवडणार नाही. यासाठीच मी कमेंट्स डिलीट केल्यात. मी आणि भावासाठी तुमचे प्रेम समजू शकते. तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद. 

अर्जुन कपूरने सुरु केली शूटिंग

श्रीदेवीचा सावत्र मुलगा अर्जुनने पंजाबमध्ये नमस्ते इंग्लंडची शूटिंग सुरु केलीये. मात्र अंशुला वडिलांसोबत आहे. विशेष म्हणजे सावत्र आईच्या निधनानंतर अर्जुन कपूर शूटिंग अर्धवट सोडून मुंबईत परतला होता.