अंकिता लोखंडे बॅकलेस ड्रेसमुळे ट्रोल...कंगनाचा हॉट अँड बोल्ड लूक चर्चेत

कंगना राणौतचा पहिला होस्ट केलेला शो 'लॉक अप' हिट ठरला आहे. या शोच्या टीमने सक्सेस पार्टी केली. अंकिता लोखंडेचा पार्टीतील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Updated: May 9, 2022, 10:32 AM IST
अंकिता लोखंडे बॅकलेस ड्रेसमुळे ट्रोल...कंगनाचा हॉट अँड बोल्ड लूक चर्चेत title=

मुंबईः अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या कूल स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. अंकिता प्रत्येक लूक व्यवस्थित कॅरी करते. मात्र, यावेळी अंकिताचा लूक तिच्यासाठी काही अडचणी निर्माण करणारा दिसला. अंकिता लोखंडे नुकतीच कंगना रणौत आणि एकता कपूरच्या OTT शो 'लॉक अप' च्या सक्सेस पार्टीत सहभागी होण्यासाठी पती विकी कौशलसोबत आली होती.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अंकिता अतिउत्साही स्टाईलमध्ये दिसत आहे. यादरम्यान, एकता कपूरला पाहून ती खूप उत्साहित झाली आणि तिला जोरात मिठी मारली. यादरम्यान व्हिडिओमधील स्टाइलच्या बॅकलेस स्टाइलवर सर्वांच्या नजरा खिळल्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एकता कपूरला मिठी मारल्यानंतर, अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत रेड कार्पेटवर पापाराझींना पोज दिली. यादरम्यान अंकिता तिचा ड्रेस फिक्स करताना दिसली. अशा स्थितीत अंकिताच्या ड्रेसची  हायस्लिट इतकी जास्त होती की, यावेळी ती उप्स मोमेंटचीही शिकार झाली.

यासोबतच या पार्टीत कंगना राणौतच्या बोल्डनेसचीही जोरदार चर्चा आहे. कंगना पार्टी मोडमध्ये अतिशय क्यूट ड्रेसमध्ये दिसली आणि एकता कपूरसोबत अनेक फोटो क्लिक करताना दिसली

लॉक अप या रियालिटी शोचा फिनाले नुकताच पार पडला. मुनव्वर फारूकी पहिल्या सीझनचा विजेता ठरला. या पार्टीतला मुनव्वरचा साधेपणाही लोकांना आवडला आहे.

पहिल्या सीझननंतर आता या शोच्या दुसऱ्या सीझनचीही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. शोला मिळालेले प्रेम आणि यश यासाठी टीमने सक्सेस पार्टीमध्ये खूप सेलिब्रेट केले. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.