मुंबई : 'सारेगमप लिटील चॅम्प' या हिंदी गाण्यांच्या रिअॅलिटी शोमध्ये मराठी झेंडा फडकला आहे. अंतिम फेरीत अहमदनगरची अंजली गायकवाड विजयी झाली आहे. अंजली गायकवाड आणि पश्चिम बंगालमधील श्रेयन भट्टाचार्य या दोघांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस विभागून देण्यात आलं. जयपूरमध्ये 'सारेगमप लिटील चॅम्प'च्या 2017 च्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडला.
नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि जावेद अली, हे तिघे मुख्य परीक्षक, तर 30 सदस्यांची ज्युरी जज या कार्यक्रमात होते. तर आदित्य नारायणने सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडली. गेल्या आठ महिन्यांपासून ‘सारेगमप लिटील चॅम्प’ बननण्यासाठी स्पर्धा सुरु होती. अंतिम फेरीत अंजली गायकवाड, श्रेयन भट्टाचार्य, शन्मुखप्रिया, धृन टिक्कू, वैष्णव गिरीश आणि सोनाक्षी कर या सहा जणांमध्ये स्पर्धा होती.