Animal Box Office Collection Day 1 : पहिल्या दिवशी रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' नं केला 100 कोटींचा आकडा पार!

Animal Box Office Collection Day 1 : रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'नं पहिल्याच दिवशी केला 100 कोटींचा आकडा पार...

दिक्षा पाटील | Updated: Dec 2, 2023, 10:31 AM IST
Animal Box Office Collection Day 1 : पहिल्या दिवशी रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' नं केला 100 कोटींचा आकडा पार!  title=
(Photo Credit : Social Media)

Animal Box Office Collection Day 1 : काल 1 डिसेंबर रोजी रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटानं खूप जास्त कमाई केली असून हा चित्रपट पहिल्याच दिवशी खूप मोठी ओपनिंग करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. इतकंच नाही तर चित्रपटानं आगाऊ बूकिंगमध्ये देखील वाढ झाली आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटानं पहिल्या दिवशी किती कमाई केली.

रणबीर कपूरच्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी अपेक्षे पेक्षा जास्त कमाई केली आहे. 'ॲनिमल' आधी  रणबीर कपूरच्या कोणत्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असेल तर तो 'ब्रह्मास्त्र' होता. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं 36.42 कोटींची कमाई केली होती. तर Sacnilk नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, 'ॲनिमल' नं आगाऊ बूकिंग द्वारे 61 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सगळ्यात जास्त या  चित्रपटानं एनसीआरमध्ये कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपटगृहातील गर्दी विषयी बोलायचे झाले तर हा 62.47% थिएटर फूल होते. तर नाइट शोज 84.07% थिएटर भरलं होतं. 

वर्ल्डवाइड कमाई विषयी बोलायचे झाले तर पहिल्याच दिवशी चित्रपटानं 100 कोटींचा आकडा पार केला आहे. याविषयी चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी शाहरुख खानच्या पठाणनं 57 कोटींची कमाई केली होती. तर वर्ल्ड वाइड या चित्रपटानं 104.80 कोटी रुपये कमावले होते. सनी देओलच्या 'गदर 2' विषयी बोलायचे झाले तर त्यानं पहिल्या दिवशी देशात 40.1 कोटींची कमाई केली होती. तर शाहरुख खानच्या जवान चित्रपटानं पहिल्या दिवशी भारतात 75 कोटींची कमाई केली होती. 

हेही वाचा : Sam Bahadur Twitter Review: 'सॅम मानेकशॉ' यांच्या भूमिकेत विकी कौशलनं जिंकली प्रेक्षकांची मने, आनंद महिंद्रा म्हणाले...

खरंतर चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक आणि त्याची भूमिका ही कधीही कोणीही न पाहिलेली आहे. तर बॉबी देओलची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. अमेरिकेत हा चित्रपट 30 नोव्हेंबर गुरुवारी प्रदर्शित झाला तर त्या दिवशी चित्रपटानं 8.3 कोटींची कमाई केली. त्याशिवाय आंध्र प्रदेशमध्ये देखील या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सकाळी 6 चे शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन हे 'अर्जुन रेड्डी' आणि 'कबीर सिंह' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे.  संदीप रेड्डी वांगा यांच्या दिग्दर्शनाचे दाक्षिणेत लाखो चाहते आहेत. तर या चित्रपटात सगळ्यांची मने जिंकणारी आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत आहे.