अनिल कपूर यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

 या भेटीमुळे अभिनेता अनिल कपूर खूप उत्साहित आहेत.

Updated: Jan 17, 2019, 09:41 AM IST
अनिल कपूर यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी जवळपास सगळेच कलाकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते. तर त्या अगोदर सर्व फिल्ममेकर्सने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. प्रत्येक कलाकाराने आपल्याला सिनेमा बनवताना येणाऱ्या अडचणी पंतप्रधान मोदींसोबत व्यक्त केल्या. तसेच पंतप्रधान मोदींनी या फिल्ममेकर्स आणि कलाकारांकडून काय अपेक्षित आहे हे देखील त्यांनी या भेटीत सांगितलं. यानंतर आता बॉलिवूडचे 'मिस्टर इंडिया' म्हणजे अभिनेता अनिल कपूर यांनी मोदींची भेट घेतली आहे. 

मोदींसोबत भेट झाल्यानंतर एनर्जेटिक अनिल कपूर आणखी उत्साहित दिसले. या मुलाखतीचे फोटोही अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बराचवेळ चर्चा झाल्याचं सांगत या भेटीमागील भावना व्यक्त केली. अनिल कपूर यांनी लिहिलं आहे की, 'मला आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली, मी त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे प्रेरित झालो आहे. त्यांचा करिश्मा आपल्यावर नक्कीच प्रभाव टाकतो. मला खासगी भेटल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे'.

 

 

या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल कपूर एकमेकांसमोर बसलेले दिसत आहेत. या भेटीमुळे अभिनेता अनिल कपूर खूप उत्साहित असलेले या फोटोतून दिसतंय. या भेटीतून अनेक चांगल्या गोष्टी समोर येण्याची दाट शक्यता आहे. 

 

PM मोदी से मिलकर खिलखिला उठे बॉलीवुड सितारे, रणवीर सिंह ने क्लिक की सेल्फी

काही दिवसांपूर्वी सर्व बॉलिवूड कलाकार मोदींच्या भेटीला गेले होते. यामध्ये करण जोहर, रणवीर सिंह, आलिया भट्ट, विक्की कौशल, आयुष्यमान खुराना, राजकुमार राव, रोहित शेट्टी, भूमी पेडणेकर, एकता कपूर, वरूण धवन यासारखे कलाकार उपस्थित होते. या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काढलेला सेल्फी काही काळ ट्रोल झाला आणि वादात अडकला होता.