कपूर कुटुंबात पुन्हा सनई- चौघड्यांचे सूर, वधू- वराचा पहिलावहिला Photo Viral

सनई- चौघडे वाजले आणि चाहत्यांमध्येही याबाबतचं कुतूहल पाहायला मिळालं

Updated: Aug 16, 2021, 06:34 PM IST
कपूर कुटुंबात पुन्हा सनई- चौघड्यांचे सूर, वधू- वराचा पहिलावहिला Photo Viral  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : कोरोना काळातही लग्नसराईचे दिवस आले आणि पाहता पाहता विवाहसोहळ्यांची चलती पाहायला मिळाली. सेलिब्रिटी वर्तुळातही अनेकांनीच लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली. यातच कपूर कुटुंबातही सनई- चौघडे वाजले आणि चाहत्यांमध्येही याबाबतचं कुतूहल पाहायला मिळालं. 

अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुलगी रिया कपूर (Rhea Kapoor) हिनं प्रियकर करण बुलानी याच्याशी विवाहबंधनात अडकत वैवाहिक जीवनाची सुरुवात केली आहे. शनिवारी रात्री कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा छोटेखानी विवाहसोहळा पार पडला. अनिल कपूर यांच्या जुहू येथील निवासस्थानी हा सोहळा पार पडला. यावेळी कुटुंबाव्यतिरिक्त फार क्वचितच बाहेरील मंडळी पाहायला मिळाली. 

बॉलिवूडमध्ये (Bollywood) या विवाहसोहळ्याची चर्चा सुरु असतानाच वधू-वराचे फोटो नेमके कधी पाहायला मिळतार हाच प्रश्न चाहत्यांना पडला आणि अखेर खुद्द नवविवाहित दाम्पत्यानंच या प्रश्नाचं उत्तर दिलं, तेसुद्धा फोटोंसह. 

12 वर्षांनंतर मला कोणतंही दडपण नसेल. कारण, तू माझा सर्वात खास मित्र आणि खुप चांगला व्यक्तीही आहेस.... असं लिहित रियानं करणसोबतचा एक व्हिडीओ फोटो शेअर केला. या फोटोमध्ये रिया आणि करण एकमेकांच्या हातांकडे अतिशय कुतूहलानं आणि प्रेमानं पाहताना दिसत आहेत. एका नव्या प्रवासाची सुरुवात केल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. 

फक्त रियाच नव्हे, तर करणनंही लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत या क्षणांचा आनंद व्यक्त केला. जिथं त्यानं रियाचा हात हातात घेतला असून, त्याचा आनंद चेहऱ्यावरुन झळकत आहे. रिया आणि करणनं लग्नासाठी ऑफ व्हाईट रंगाच्या पेहरावाला पसंती दिली होती. जिथं रियाच्या डोक्यावरील ओढणीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. बारीक मोतीवजा मण्यांची ही जाळीदार ओढणी तिच्या लूकला उठावदार करत होती.