Video Viral : पाहा मावशीच्या पाठवणीवेळी आराध्यानं बजावली महत्त्वाची भूमिका

 ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन बॉलिवूडमधील चाहत्यांच्या आवडत्या कपलपैकी एक आहेत. 

Updated: Aug 16, 2021, 05:49 PM IST
 Video Viral : पाहा मावशीच्या पाठवणीवेळी आराध्यानं बजावली महत्त्वाची भूमिका title=

मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन बॉलिवूडमधील चाहत्यांच्या आवडत्या कपलपैकी एक आहेत. यासोबतच त्यांची मुलगी आराध्या देखील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. आराध्याला अनेकदा तिची आई ऐश्वर्यासोबत लग्न आणि फंक्शनमध्ये स्पॉट केलं जातं. जिथे तिने नेहमीच तिच्या साधेपणानं आणि क्यूटनेसने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता ऐश्वर्याच्या चुलत बहिणीच्या लग्नाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये आराध्याच्या मोठ्या मनाने लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.

ऐश्वर्याच्या चुलत बहिणीच्या लग्नाचा व्हिडिओ आला समोर
हा व्हिडिओ फेब्रुवारीमधील ऐश्वर्याच्या चुलत बहीण श्लोका शेट्टीच्या लग्नातील आहे. या लग्नाला ऐश्वर्या तिच्या कुटुंबासोबत तिथे पोहोचली. या लग्नात ऐश्वर्या अतिशय सुंदर लाल लेहेंगामध्ये दिसली होती. या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

आराध्याने चाहत्यांची मने जिंकली
पण नुकताच समोर आलेला व्हिडिओ श्लोकाच्या निरोप समारंभाचा आहे. विदाईच्यावेळी, श्लोका तिच्या आईला मिठी मारते आणि रडू लागते. आणि त्यानंतर जेव्हा ती तिची बहीण ऐश्वर्या आणि भाची आराध्याकडे पोहचते, तेव्हा आराध्या रडणाऱ्या श्लोकाला प्रेमाने शांत करते. व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की, श्लोका आंटी रडू नको, मी आहे. आराध्याकडून हे ऐकून तिथल्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल येते. आराध्याचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे आणि तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आराध्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
हा व्हिडिओ आणि फोटो मोंक्स इन हॅपीनेस नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आली आहेत. ज्यावर चाहतेही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. आणि आराध्यावरही भरपूर प्रेम केलं जात आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटात ऐश्वर्या दिसणार आहे
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ऐश्वर्या सध्या मणिरत्नमच्या पोन्नीयन सेल्वानचं शूटिंग करत आहे. मनी रत्नम दिग्दर्शित हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे.