Bold Indian Web Series: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने 1999 पासून आपल्या टेलिव्हिजन करिअरला सुरुवात केली आणि तिने नकारात्मक भूमिकाही साकारल्या. एका सर्वसामान्य घराण्यातून आलेल्या अभिनेत्रीच्या कुटुंबातील कोणीही इंडस्ट्रीत नाही. अशा परिस्थितीत इंडस्ट्रीत नाव कमावणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. 'भाभी जी घर पर हैं' या मालिकेतून घराघरात पोहचली. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिचा या मालिकेच्या निर्मात्यांशी काही मतभेद झाले आणि तिने ही मालिका सोडली.
2018 मध्ये बिग बॉस सीझन 11 ची ती विजेती देखील झाली आहे. भाभी जी घर पर हैं!' या मालिकेत तिने अंगूरी भाभी' ही भूमिका साकारली होती. जी प्रचंड लोकप्रिय झाली होती. आजही तिला 'अंगूरी भाभी' म्हणूनच ओळखतात. 'अंगूरी भाभी' हे पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. शिल्पाची काही दिवसांपूर्वी एक वेब सीरिज रिलीज झाली होती, त्यामधील तिने दिलेले बोल्ड सीन पाहून आश्चर्यचकित झाले होते.
'पौरशपूर' असं या वेब सीरिजचं नावं होतं. काही महिन्यांपूर्वी ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये अभिनेत्रीने दिलेल्या बोल्ड सीनची जोरदार चर्चा झाली होती. तिचे सिरीजमधील पाहून सगळेच हैराण झाले होते. या वेब सिरीजमध्ये तिने राणी मीराबतीची भूमिका साकारली आहे. तिच्या या पात्रालाही प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला होता. आपल्या बोल्डनेसने अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांची मने जिंकली होती. भाभीजी घर पर हैं मधील सोज्वळ अंगुरी भाभीला या वेबसिरजमध्ये बोल्ड अंदाजात पाहून चाहते हैराण झाले होते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवर ही अंगुरी भाभीच आहे का? असा प्रश्न विचारत होते.
'कभी आये ना जुदाई' आणि 'संजीवनी' सारख्या टीव्ही शोमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, शिल्पाला खरी ओळख मिळाली ती 'भाभी जी घर पर हैं!' या मालिकेतील अंगूरी भाभीची भूमिकेने. मात्र, काही दिवसातच तिने ही मालिका सोडली. यानंतर शिल्पाने रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस'च्या 11व्या सीझनमध्ये भाग घेतला. ती 'बिग बॉस 11' ची विजेती देखील आहे.
'भाभी जी घर पर हैं'मध्ये अंगूरी भाभीच्या भूमिकेत घराघरात नाव कोरलेली शिल्पा शिंदे अनेकदा चर्चेत असते. अंगूरी भाभीच्या भूमिकेतील शिल्पाला चाहत्यांनी खूप पसंती मिळाली होती.