अनन्या पांडेने गुपचुप उरकलं लग्न? लाल साडीत 'या' अभिनेत्यासोबत हैदराबादमध्ये स्पॉट...पाहा व्हिडीओ

एरवी ती आपल्या मोठ्या स्टाईल स्टेटमेंट्समुळे लोकप्रिय असते. 

Updated: Jul 22, 2022, 11:31 AM IST
अनन्या पांडेने गुपचुप उरकलं लग्न? लाल साडीत 'या' अभिनेत्यासोबत हैदराबादमध्ये स्पॉट...पाहा व्हिडीओ title=

Liger Trailer Launch: अनन्या पांडे आता सगळीकडे भलतीच चर्चेत असते ती तिच्या ट्रोलिंगमुळे. सध्या बॉलीवूडमध्ये नेपोटिझमच वावडं आहे. त्यामुळे त्यावर तिला ट्रोलर्सही सतत छळत असतात. नुकतीच ती 'गेहेरांईयां' या सिनेमातून दिसली होती परंतु तिच्या अभिनयाचे फार कौतुक झाले नाही. एरवी ती आपल्या मोठ्या स्टाईल स्टेटमेंट्समुळे लोकप्रिय असते. 

नुकताच तिच्या 'लायगर' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च हैेद्राबादमध्ये पार पडला. तिथे करन जोहरसह अन्य मंडळी आलेली होती तेव्हा आपल्या या नव्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी अनन्या पहिल्यांदाच हैद्राबादमध्ये गेली होती. 

ट्रेलर लॉन्चचा दिवस अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्यासाठी खूप मोठा दिवस होता कारण संपूर्ण भारतात त्यांच्या 'लाइगर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर अॅक्शनने भरलेला आहे आणि भरपूर ड्रामा आहे. ट्रेलर रिलीज होण्याआधीच या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली होती. या सिनेमाची संपूर्ण टीम हैदराबादमध्ये भव्य ट्रेलर लॉन्चसाठी दाखल झाली. अनन्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर इव्हेंटमधील व्हिडिओ शेअर केले आहेत आणि चाहत्यांना त्यांच्या शहरात त्यांच्या आवडत्या स्टार्सचे स्वागत केले याबद्दल तिने आनंद व्यक्त केला आहे. 

त्यांच्या स्वागताच्या वेळी अनन्याने लाल रंगांची साडी नसली होती तर विजय पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता आणि ते ज्या कारमध्ये उभे होते त्या कारच्या आजूबाजूला चाहत्यांची गर्दी जमली होती. एकीकडे कोणी ढोल वाजवत आहेत तर कोणी त्याच्यासाठी म्यूझिक लावले आहे. हा सीन पाहून असं वाटतं होतं त्या दोघांचे लग्नच पार पडले आहे. 

करण जोहर, विजय देवरकोंडा, पुरी जगन्नाध, अनन्या पांडे, अपूर्व मेहता आणि इतरांनी हैदराबाद येथे चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला उपस्थित राहण्यासाठी कालिना विमानतळावरून खाजगी विमान घेतलं होतं. हैद्राबाद येथे 'लायगर'चा तेलुगू ट्रेलर लॉन्च झाला. 

तेव्हा या स्वागताला पाहून अनन्या म्हणाली, आमच्यावर फुलं उधळली गेली. जल्लोषात, अगदी बॅन्ड बाजाप्रमाणे माझे आणि विजयचे स्वागत झाले. मी लाल साडी नेसले होते तेव्हा असं वाटतं होतं की माझं लग्नच होतंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'लायगर' हा सिनेमा पॅन इंडिया रिलिज होणार आहे.