लव्ह बर्ड्स दिसले पुन्हा एकत्र; चेहरा लपवतं अनन्या दिसली अन् आदित्य मात्र...

Ananya Pandey and Aditya Roy Kapoor: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांची. सध्या ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. स्पेनवरून परतल्यावर ते दोघं पुन्हा एकदा स्पॉट झाले आहेत यावेळी अनन्या मात्र आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 23, 2023, 07:53 PM IST
लव्ह बर्ड्स दिसले पुन्हा एकत्र; चेहरा लपवतं अनन्या दिसली अन् आदित्य मात्र...  title=
July 23, 2023 | ananya pandey and harshavardhan kapoor spotted in a car hiding their faces photos goes viral

Ananya Pandey and Aditya Roy Kapoor: गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरची. ते दोघं स्पेनला गेल्यापासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे फोटो हे व्हायरल होऊ लागले आहेत. त्यातून आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे ते दोघं कुठे कुठे स्पॉट होतायत याची. सध्या ते दोघं एका ठिकाणी एकत्र दिसले होते त्यानंतर त्यांना एकत्र गाडीमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. यावेळी ते दोघं एकत्र होते. दोघंही फार खुश दिसत होते परंतु यावेळी अनन्या ही आपला चेहरा लपवतं होती आणि आदित्य गाडी चालवत होता तेव्हा ती त्याच्या बाजूला तिथे बसली होती. परंतु ती पापराझींना आपला चेहरा दाखवत नव्हती. त्यामुळे तिच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. 

तिच्या आणि आदित्य रॉय कपूरच्या नात्याची अनेकदा चर्चा होताना दिसत होती. काही दिवसांपुर्वी त्या दोघांनी लॅक्मे फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती. त्यांचा हा रॅम्पवॉक अनेकांना आवडला होता. यावेळी ते दोघंही ब्लॅक कपड्यांमध्ये दिसले होते. अनन्यानं तेव्हा चेक्सचा शिमर आऊटफिटचा ड्रेस घातला होता. तर आदित्य रॉय कपूरनं ब्लॅझर, शर्ट आणि पॅण्ट घातली होती. यावेळी या दोघांनी खूप हटके अशा पोझेज दिल्या होत्या त्यामुळे त्यांच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यानंतर काहीप्रमाणात ते दोघं एकत्रही स्पॉट झाले होते. आता ते स्पेनमध्ये एकत्र स्पॉट झाल्यानं ते कुठल्या सिनेमाचे शुट करत होते का असेही अनेक तक्र निघाले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु त्यांचे सतत फोटो रिव्हिल होत असल्यानं त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना चांगलाच जोर आला आहे. 

हेही वाचा - तिचं लग्न झालंय पण ती माझ्या प्रेमात वेडी आहे; दुबईतील श्रीमंत महिलेसोबत अनिल कपूरचा लेक सिक्रेट रिलेशनशिपमध्ये?

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे सध्या चर्चेत आहेत. आपल्या स्पेन ट्रीपवरून परतल्यानंतर आता ते दोघं पुन्हा स्पॉट झाले आहे. काळ्या रंगाच्या महागड्या गाडीतून ते कुठेतरी प्रवास करताना दिसत होते. यावेळी ते दोघं कुठेतरी आऊटिंगला अथवा कुठेतरी डीनरला बाहेर गेले होते. तेव्हा ते दोघं बाहेर आल्यानंतर पापाराझींनी त्यांना घेरण्याचा एकही प्रयत्न सोडला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी अनन्या मात्र आपला चेहरा लपवताना दिसली होती. ते दोघंही यावेळी जोरात हसतानाही दिसत होते. त्यामुळे नेटकऱ्यांनीही त्यांची खिल्ली उडवली आहे. परंतु सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.