लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आनंद इंगळे स्पष्टचं बोलला, म्हणाला...

नुकतंच लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडलं. नुकतेच त्यावर एक्झिट पोल जाहीर झाले असून सगळ्यांचं लक्ष निकालाकडे आहे. 

Updated: Jun 2, 2024, 03:55 PM IST
लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आनंद इंगळे स्पष्टचं बोलला, म्हणाला... title=

मुंबई : अभिनेता आनंद इंगळे कायमच त्याच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असतो. नुकतंच लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडलं. नुकतेच त्यावर एक्झिट पोल जाहीर झाले असून सगळ्यांचं लक्ष निकालाकडे आहे. मात्र लोकसभेच्या निकालावर अभिनेता आनंद इंगळे याने मोठं वक्तव्य केलं आहे. नुकतीच आनंदने एक मुलाखत दिली

आनंद इंगळेने 'तारांगण' या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलमुलाखत दिली.  यावेळी आनंद इंगळेला लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रश्न विचारला गेला.  लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत तुमचा अंदाज काय आहे? असा प्रश्न आनंदला विचारला गेला. याविषयी आनंद म्हणाला की, ''यावेळेला अंदाज लावणं खूप अवघड आहे आणि मीही अत्यंत सामान्य जनतेने प्रमाणे म्हणजेच गरीब किंवा अनभिज्ञ हे मी फक्त पैशाच्या अर्थाने म्हणतं नाहीये वेगळ्या अर्थाने म्हणतोय. आम्हाला माहितीच नाही कसं होईल? असा भाभडा विचार करणाऱ्या लोकांप्रमाणे झालं आहे. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल याचा अंदाज लावू शकतोय का? मी राजकीयदृष्ट्या निरक्षर असणं असं अजिबात म्हणत नाहीये. 

पुढे आनंद म्हणाला, ''त्याच्यासाठी सजग असलं पाहिजे. मी माझं मत दिलंच की, फक्त मला खरोखरचं या वेळेला अवघड असल्यासारखं वाटतंय. विचारधारेमधला फरक असू शकतो. तुमची एक विचारधारा, माझी एक विचारधारा. मी यावेळेस या विचारधारेला मत दिलं होतं.'' 

पुढे आनंद म्हणाला, ''पण दुसरी विचारधारा निवडून आली. जास्त लोकांना ती विचारधारा निवडून यावी असं वाटतं होतं आणि त्यांनी तो राज्यकारभार केला इतकं सोप होतं. पण आता म्हणजे माझी विचारधारा आहे आणि ज्या विचारधारेला मी मत देतो आहे, त्याच्यातलं कोणीतरी दुसरीकडे जातात, पुन्हा परत येतात. काहीच कळेना झालंय. जनतेसाठी हा गोंधळ झालाय. आपल्याकडे गोंधळाचं वातावरण आहे. जे राजकीय विश्लेषक आहेत, त्यांनाही वाटतंय की यावेळेला अवघड आहे. तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना काय वेगळं वाटणार?असं  आनंद इंगळे म्हणाला.

पुढे अभिने, मला याचा राग येण्यापेक्षा असहाय्य होतं. राग येऊन काय होणार आहे. असहाय्य होतं आणि वाटतं, बाबांनो हे कशासाठी चाललं आहे? आणि खरोखर मला हे मनापासून वाटतं की, आम्ही काय मुर्ख आहोत का? इतकंपण नका ना करू. एका अख्ख्याच्या अख्खा प्रचंड मोठा वर्ग एका विचारधारेच्या मागे असताना त्याच्या विरुद्ध विचारधारेच्या पक्षाबरोबर हातमिळवणी करता. तर तुम्हाला कधीच अरे बापरे लोक काय म्हणतील, याची भीती नाही का वाटत? ती वाटत नसेल तर आम्ही किती असहाय्य आहोत सांगा बरं. पण आता भूमिका बदलणाऱ्यांना भीती वाटत नाहीये हे स्पष्ट दिसतंय.'' असं अभिनेता म्हणाला.