PHOTO: 'चेहरे' चित्रपटातील बिग बींचा 'फर्स्ट लूक' व्हायरल

'मिस्ट्री थ्रिलर 'चेहरे'

Updated: May 14, 2019, 01:35 PM IST
PHOTO: 'चेहरे' चित्रपटातील बिग बींचा 'फर्स्ट लूक' व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड मेगास्टर अमिताभ बच्चन आणि अभिनेता इमरान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र 'चेहरे' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटाचं शूटिंग गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईत सुरु झालं आहे. दिग्दर्शक रूमी जाफरी 'चेहरे' चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. 

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी 'आणखी एक मीटर डाऊन...रूमी जाफरीसह नवीन चित्रपट सुरु केला आहे...चेहरे. लॉग्न स्टॅन्डिंग कमिटमेंट'. अशा कॅप्शनसह बिग बींचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनीही बिग बींच्या फर्स्ट लूकचे काही फोटो शेअर केले आहेत.

 

इमरान हाश्मीनेही एक फोटो शेअर करत ट्विट केलं आहे. 'मिस्ट्री थ्रिलर 'चेहरे'चं शूटिंग अमिताभ बच्चन यांच्यासह सुरु झालं' असल्याचं ट्विट केलं आहे.

'चेहरे' चित्रपटाव्यतिरिक्त अमिताभ बच्चन आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातूनही भूमिका साकारणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रम्हास्त्र' २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'चेहरे' चित्रपटातून कृती खरबंदा, रिया चक्रवर्ती, सिद्धांत कपूर, दृतमान चक्रवती, रघुवीर यादव आणि अनु कपूर हे कलाकारही प्रमुख भूमिकेत या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'चेहरे' २१ फ्रेब्रुवारी २०२० रोजी चित्रपटगृहात पदर्शित होणार आहे.