Aishwarya Rai Bachchan News: इमरान हाशमी हा बॉलिवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे. अनेक शानदार आणि सुपरहिट चित्रपटांचा तो एक भाग आहे. अभिनयाच्या जोरावर इमरान हाशमीने इंडस्ट्रीतमध्ये त्याची ओळख निर्माण केली आहे. इमरान हाशमी सतत वादांपासून दूर असतो. मात्र, त्याला ऐश्वर्या राय बच्चन बद्दलच्या जुन्या कमेंट्सबद्दल मोठा पश्चाताप होत आहे. इमरान हाशमीला ऐश्वर्या रायला भेटून त्या कमेंटबद्दल माफी मागायची आहे. मात्र, एश्वर्या राय वेळ देत नाही अशी माहिती समोर आली आहे.
करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या चौथ्या सीझनमध्ये इमरान हाशमीने ऐश्वर्या रायवर कमेंट केली होती. जेव्हा तो शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. त्या कमेंटमुळे इमरान हाशमीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. 'कॉफी विथ करण 4' मधील रॅपिड फायर राऊंड दरम्यान इमरान हाशमीने माजी मिस वर्ल्डला 'प्लास्टिक' म्हटलं होतं. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.
इमरान हाशमीला होतोय पश्चाताप
ऐश्वर्या रायवर केलेल्या कमेंटमुळे इमरान हाशमीला पश्चाताप झाला आहे. आता एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत, इमरान हाशमीने या विषयावर बोलला असून त्याने खेदही व्यक्त केला आहे. इमरान हाशमीने सांगितले की, त्याच्या या वक्तव्यामुळे मला खूप लाज वाटते. तो म्हणाला की, मी ऐश्वर्या राय बच्चनचा खूप आदर करतो.
'शोच्या संदर्भात हा एक विनोद होता'
इमरान हाशमी म्हणाला की, जर कोणी या शोच्या संदर्भातून बाहेर काढले असेल तर ते योग्य नाही. आता सोशल मीडियावर लोक लवकर रागावतात. लोक खूप संवेदनशील झाले आहेत. मात्र, शोच्या संदर्भात हा विनोद असल्याचेही त्यांनी सांगितले. पण आजचा समाज असा झाला आहे की, अशी उत्तरे कोणीच देऊ शकत नाहीत.