अमिताभ यांना हरिवंशराय यांनी सांगितलेली ''दगडाची गोष्ट'' फार काही सांगून जाते...

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन 4 दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत

Updated: May 13, 2021, 05:47 PM IST
अमिताभ यांना हरिवंशराय यांनी सांगितलेली ''दगडाची गोष्ट'' फार काही सांगून जाते... title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन 4 दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांनी नेहमीच आपल्या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारुन चाहत्यांची मने जिंकली. भलेही आज अमिताभ सुपरस्टार आहेत, पण संघर्षाच्या काळात वडील हरिवंश राय बच्चन यांच्याकडून मिळालेली शिकवण ते कधीच विसरले नाही. अमिताभ बच्चन यांनी एका सांगितलं होतं की, वडिलांकडून शिकणं त्यांच्यासाठी यशाचं एक कारण कसं राहिले.

अमिताभ बच्चन यांनी सांगितले होतं की, 'त्यांचे वडील दररोज सकाळी फिरायला जात असत. आणि वाटेत पाहिलेला एक दगड किंवा मूर्ती घरी आणत असत. घरी आणल्यावर ते त्या दगडांवर पेंटींग करून त्याला मनुष्य किंवा प्राण्यांचे स्वरूप देत असतं. बच्चन यांच्या घराच्या उंबरठ्यावर एक मोठा दगड पडलेला होता.

तो दगड हरिवंश राय बच्चन यांना उचलून आणखी जवळ आणायचा होता, तो दगड पाहून अमिताभ म्हणाले, 'बाबूजी, हा दगड फारच जड असेल, आपल्या दोघांनाही हा दगड उचलता येणार नाही. मी काही लोकांना बोलावतो. हा दगड इथं पर्यंत कोणी आणला? '

अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, हे ऐकून बाबूजी म्हणाले की, मी हा दगड आणला आहे. मी आश्चर्यचकित झालो आणि त्यांना विचारलं, तुम्ही एवढा मोठा दगड कसा आणला? मग ते म्हणाले, 'मी दररोज हा दगड थोडा हलवायचो. असं केल्यावर एका महिन्यांत मी हा दगड आणू शकलो.' वडिलांची ही गोष्ट अमिताभ बच्चन यांच्या हृदयात बसली. एकाच दिवसात यश मिळवणं शक्य नसतं हे त्यांना कळालं. याच मेहनतीच्या जोरावर आज अमिताभ बच्चन महानायक बनले.