बिग बींना भेटण्यासाठी छोटा चाहत्याने भेदलं सुरक्षकड; महानायक भावूक

महानायकाच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंतचा त्यात समावेश आहे. 

Updated: Nov 21, 2022, 10:04 PM IST
बिग बींना भेटण्यासाठी छोटा चाहत्याने भेदलं सुरक्षकड; महानायक भावूक title=

Amitabh Bachchan Twitter : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं होतं. 70 ते 90 च्या दशकापर्यंत इंडस्ट्रीवर राज्य करणारे बिग बी आजही अभिनयात तरुण अभिनेत्यांना मागे टाकतात. आज प्रत्येकाला माहित आहे बच्चन कुटुंबाकडे प्रचंड संपत्ती आहे. 

अमिताभ बच्चन आणि बच्चन कुटुंब रॉयल आयुष्य जगतात. मात्र, लक्झरी लाईफस्टाईल, स्टारडमपासून दूर राहून स्वत:चे कपडे स्वत: धुवणारे बिग बी अत्यंत साधे आहेत. हे जाणून तुम्हाला देखील नक्कीच धक्का बसला असेल, पण ही गोष्ट अगदी खरी आहे. असाच त्यांचा साधेपणा एका फोटोवरुन समोर आला आहे जो पाहून चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

महानायकाच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंतचा त्यात समावेश आहे. आणि याचंच उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं. बिग बींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या छोट्या चाहत्याचा उल्लेख केला ज्याने बिग बींना आपल्या बिनशर्त प्रेमाने भावूक केलं.

अमिताभ बच्चन अनेकदा ब्लॉग लिहितात, अलीकडेच त्यांनी ब्लॉगमध्ये त्यांच्या छोट्या चाहत्याची ओळख करून दिली जो त्यांचा सुरक्षा घेरा तोडून थेट बिग बींना भेटायला आला होता. बीग बींना पाहून चिमुकला चाहता स्वत:चे अश्रू रोखू शकला नाही,  त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि त्याने वडिलांनी लिहीलेली कविता अमिताभ बच्चन यांना ऐकवली.

एवढंच नाही तर त्याने अमिताभ बच्चन यांचं एक पेंटिंग सोबत आणलं होतं ज्यावर त्यांनी त्यांचे आयडॉल अमिताभ बच्चन यांचा ऑटोग्राफही घेतला होता. त्या मुलाने अमिताभचा हिट चित्रपट डॉनचाही उल्लेख केला. अगदी चित्रपटाचे डायलॉगही त्याला सुनावले.

अशा चाहत्याला भेटल्यावर अमिताभ बच्चन भावूक झाले
आपल्या लोकप्रियतेबद्दल ऐकून अनेकदा संकोच करणारे अमिताभ बच्चन या छोट्या चाहत्याला पाहूनही थक्क झाले. असं प्रेम पाहून ते स्वत:ला भावूक होण्यापासून रोखू शकले नाहीत, तर त्यांनी असंही सांगितलं आहे की, असा जैस्चर पाहून जेव्हा ते एकटे असतात तेव्हा ते विचार करु लागतात की,  हे सगळं त्यांच्यासोबत कसं घडत आहे आणि कसं.