बिग बींच्या नातवाला मिळाली मोठी ऑफर, आता बदलणार ओळख?

शाहरुख खानची लेक सुहाना खानला कास्ट करण्यात आल्याची या चित्रपटाविषयीची आधीची माहिती समोर आली होती. 

Updated: Aug 28, 2021, 01:07 PM IST
बिग बींच्या नातवाला मिळाली मोठी ऑफर, आता बदलणार ओळख? title=

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तर 'आर्ची' या आंतरराष्ट्रीय कॉमिक बुकच्या भारतीय रुपांतरणावर पुढील चित्रपट बनवणार आहेत. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.

शाहरुख खानची लेक सुहाना खानला कास्ट करण्यात आल्याची या चित्रपटाविषयीची आधीची माहिती समोर आली होती. आता असे सांगितले जात आहे की अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर देखील चित्रपटात दिसणार आहेत.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान झोया अख्तरच्या 'आर्ची' चित्रपटातून डेब्यू करणार आहे. बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नात अगस्त्य नंदा देखील चित्रपटात पदार्पण करणार आहे. यासाठी नुकतीच ही जोडी रिहर्सलसाठी एकत्र दिसून आली.

'अगस्त्यला अभिनयाची आवड आहे आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यास तयार असतो. चित्रपट जगतात प्रवेश करण्याच्या पारंपारिक पद्धतीच्या उलट अगस्त्य प्रथम झोया अख्तरच्या दिग्दर्शनात डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसेल आणि नंतर मोठ्या पडद्यावर वाटचाल करेल. 

त्यामुळे आता स्टार किड्स एकत्र लवकरच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.