Amitabh Bachchan : जया बच्चन किंवा रेखा नव्हे तर अमिताभ यांचे पहिले प्रेम....!

Amitabh Bachchan Celebrity Crush : अनेकांना हेच वाटतं की अमिताभ यांच्या आयुष्यात रेखा (Rekha) हे त्यांचं पहिले प्रेम (first love) होते. पण थांबा या पण एक ट्वीस्ट (Twist) आहे.  

Updated: Feb 18, 2023, 12:33 PM IST
Amitabh Bachchan : जया बच्चन किंवा रेखा नव्हे तर अमिताभ यांचे पहिले प्रेम....! title=
Amitabh Bachchan Celebrity Crush

Amitabh Bachchan Celebrity Crush: बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. बऱ्याचवेळा बिग बी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करतात. यावेळी अमिताभ यांनी त्यांच्या सेलिब्रिटी क्रश कोण आहे या विषयी खुलासा केला आहे. 'कौन बनेगा करोडपती 14' (Kaun Banega Crorepati 14) मध्ये एका स्पर्धकानं तुमचं पहिलं क्रश कोण आहे? असा प्रश्न विचारला होता. त्यावर बिग बींनी नाव सांगण टाळलं होतं. मात्र, स्पर्धकानं पुन्हा एकदा विचारल्यानंतर अमिताभ यांनी अखेर खुलासा केला. हे नाव ना रेखा (Rekha), ना जया बच्चन (Jaya Bachchan) यांचे आहे. मात्र, अमिताभ यांनी घेतलेलं नाव वाचल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.  

वाचा: 'Mirzapur' फेम अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

बॉलिवूडचे महानायक, शहेंनशाह अशा विविध नावांनी ओळखले जाणारे बॉलिवूड अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होय. अमिताभ यांचा जोरदार अभिनय आणि त्यांनी साकारलेल्या कणखर भूमिका यामुळे आज ही प्रेक्षकांचे ते ऑलटाईम फेव्हरीट कलाकार आहेत. अमिताभ यांनी अतिशय संघर्ष करत आज हे यश मिळवले आहे. त्यांच्यासाठी हा अभिनयातला प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यांना या प्रवासात त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी उत्तम साथ दिली. आपल्या अभिनयाने अनेकांना भुरळ घालणारी अभिनेत्री ते संसदेत परखड मत मांडणाऱ्या खासदार म्हणून जया बच्चन यांना ओळखले जाते. मात्र या प्रवासापूर्वी अमिताभ बच्चन यांचं पहिले प्रेम (Amitabh Bachchan Celebrity Crush) रेखा किंवा जया बच्चन या नव्हत्या तर हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे वहिदा रहमान (Waheeda Rehman)  या अमिताभ यांचे पहिले प्रेम होत्या... 

When Waheeda Rehman Slapped Amitabh Bachchan On 'Reshma Aur Shera' Sets,  Here's How Big B Reacted

वहिदा रहमान या त्यांच्या काळातील हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. वहिदा रहमान (Waheeda Rehman)  यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1938 रोजी तमिळनाडू येथील चेंगलरट्टूमध्ये झाला. 50 आणि 60 च्या दशकात वहिदा रहमान आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकत असत. वहिदा रहमान यांच्या सौंदर्याचे करोडो चाहते होते.  वहिदा रेहमान यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. वहिदा यांनी शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम केले आहे. अमिताभ यांनी सांगितले की, त्यांना वहिदा रहमान खूप आवडते आणि आजही त्या सौंदर्य आणि कामाच्या बाबतीत त्यांना खूप आवडतात.  वहिदा रहमानने अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली आहे.