अमिताभ यांचा Samsung फोन खराब, Xiaomi ने दिलं हे उत्तर

पाहा काय मिळालं उत्तर 

अमिताभ यांचा Samsung फोन खराब, Xiaomi ने दिलं हे उत्तर  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. आपले अनेक फोटो ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नुकताच त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी S9 हा फोन खराब झाला. त्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली. 

एवढंच नाही तर बिग बींनी ट्विटरवर आपल्या फॉलोअर्सकडून याबाबत मदत देखील मागितली. अमिताभ यांनी ट्विटरवर लिहिलं की, T3024 मदत करा.. सॅमसंग S9 हा फोन ठीक काम करत नाही. सॅमसंगचा लोगो दिसतोय आणि स्क्रीन सारखी ब्लिंक होत आहे... याशिवाय दुसरं काहीच होत नाही.. मदत करा... कृपया मला सांगा मी काय करायला हवं... 

बिंग बींच्या या ट्विटखाली नेटीझन्सने आणि चाहत्यांनी खूप मजेशीर उत्तर दिली. अनेकांनी त्यांना काही मार्ग सुचवला. पण खरी मजा तेव्हा आली जेव्हा या ट्विट खाली लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड शाओमी इंडियाचे एमडी मनू कुमार जैन यांनी ट्विटला रिट्वीट करून फोन बदलण्याचा सल्ला दिला.

त्या रिट्वीटमध्ये असं लिहिलं की, डिअर अमित जी... आता फोन बदलण्याची वेळ आली आहे. तुम्ही भारतातील सर्वात लोकप्रिय कंपनी असलेल्या टेक्नॉलॉजी ब्रँडवर विश्वास ठेवू शकता. जर तुमची इच्छा असेल तर आम्हाला तुम्हाला फ्लॅगशिप फोन पाठवून आनंदच होईल. यावरून स्पष्ट कळतं की मनू जैन यांचा इशारा हा शाओमीच्या स्मार्टफोनजवळ आहे. या रिट्विटवर देखील नेटीझन्सने अनेक प्रश्न उभे केले. काहींनी त्यांची मस्करी केली तर काहींनी फ्लॅगशिप फोनवर प्रश्न उभे केले. तसेच शाओमी फोनच्या जाहिरातींवरही काही लोकांनी नाराजगी व्यक्त केली. पण त्यानंतर पुन्हा एकदा बिग बी यांनी सॅमसंगचा फोन ठिक झाल्याची माहिती दिली. या ट्विटनंतर सॅमसंग कंपनीने तात्काळ फोन ठीक करण्यासाठी मदत केली. यासोबत बिग बींनी एक महत्वाची गोष्ट शेअर केली. टेक्नॉलॉजी आम्हाला बॅकअप ठेवायला असहाय्य करत आहे पण जीवनाचं बॅकअप आपण कसं घेणार