अंबानींच्या पार्टीत रणवीर सिंगचा कुर्ता कोणी फाडला?

Who Tore Ranveer Singhs Kurta : रणवीर सिंगनं अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या हळदीला हजेरी लावली होती. त्यावेळी त्याचा लूक पाहिल्यानंतर त्याचा कुर्ता कोणी फाडला असं म्हटलं जातं आहे.

दिक्षा पाटील | Updated: Jul 9, 2024, 02:10 PM IST
अंबानींच्या पार्टीत रणवीर सिंगचा कुर्ता कोणी फाडला? title=
(Photo Credit : Social Media)

Who Tore Ranveer Singhs Kurta : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. अंबानी कुटुंबातील हे शेवटचं लग्न असून त्याचा उत्साह गेल्या अनेक दिवसांपासून सुरु झाला आहे. त्यांच्या लग्नाला आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. त्याआधी सुरु असलेल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटींपासून क्रिकेटपर्यंत अनेकांनी हजेरी लावली. काल त्यांच्या हळदीचा कार्यक्रम झाला त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ हा बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा आहे. 

संपूर्ण अंबानी कुटुंब हे अनंत आणि राधिकाच्या लग्नाला खास बनवण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. लग्नाची तयारी देखील सुरु आहे. लग्नाच्या सगळ्या विधी या सामुहिक विवाह सोहळ्यानंतर मामेरूनं सुरु झाली. त्यानंतर ग्रह पूजा आणि संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर लगेच सोमवारी हळदीचा कार्यक्रम होता. हळदीच्या कार्यक्रमाला येताना सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यानंतर तिथून निघताना सगळे हळदीच्या रंगात रंगल्याचे पाहायला मिळाले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हळदीच्या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचे शाही थाटामाटत स्वागत केले. सुरुवातीला त्यांना पान खायला देण्यात आला. तर रणवीर सिंगनं एन्ट्रीच्या वेळी पान खाल्ला त्यावेळी त्यानं एक कुर्ता परिधान केला होता. तर त्यासोबत त्याच्या हातात देखील आणखी एक कुर्ता होता. त्याचे दोन्ही कुर्ते हे व्यवस्थित दिसले. मात्र, जेव्हा तो हळदीच्या कार्यक्रमातून बाहेर आला तेव्हा पाहिलं की त्याचा कुर्ता हा समोरून फाटला होता. आता अनेक नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की रणवीरचा हा कुर्ता कोणी फाडला? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : 'प्रेग्नंट दीपिकाला केस धरुन ओढलं तेव्हा रणवीर...', अभिनेत्याचा खुलासा

दरम्यान, 12 जुलै रोजी जियो वर्ल्ड कनवेंशन सेंटरमध्ये अनंक अंबानी आणि राधिका मर्चेंट हे सप्तपदी घेणार आहेत. इतकंच नाही तर लग्नाचा हा कार्यक्रम 13 जुलै आणि 14 जुलै रोजी देखील असेल. ज्यात आणखी बऱ्याच विधी पूर्ण करण्यात येतील. या लग्न सोहळ्यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्याशिवाय देशातले अनेक बड्या लोकांनी या सोहळ्यात हजेरी लावली होती. तर त्या दोघांच्या लग्नाआधी आणखी अनेक शाही विधी पाहायला मिळणार आहेत.