धूम- धडाक्यात नीता अंबानींनी केलं गणपतीचे विसर्जन, इनसाईड फोटो समोर

Ambani Ganpati Visarjan Photos:  अंबानी यांनी गणपती बाप्पाला धुम-धडाक्यात दिला निरोप... व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...

दिक्षा पाटील | Updated: Sep 22, 2023, 05:47 PM IST
धूम- धडाक्यात नीता अंबानींनी केलं गणपतीचे विसर्जन, इनसाईड फोटो समोर title=
(Photo Credit : Social Media)

Ambani Ganpati Visarjan Photos: जगातीस सगळ्यात श्रीमंत लोकांपैकी एक म्हणजे अंबानी कुटुंब. अंबानी यांचं सगळेच कार्यक्रम हे खूप ग्रॅंड असतात. नुकतेच त्यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगामन झाले. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं त्यांनी त्यांची घरी गणपती बाप्पाचे स्वागत केले होते. त्यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यात अनेक राजकारणी देखील होती. अंबानी कुटुंबानं गणपती बाप्पाचे जितक्या धुमधाममध्ये स्वागत केले. त्याच प्रमाणे त्यांना निरोपही दिला. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

नीता अंबानी यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत नीता अंबानी यांनी लाल रंगाची साडी नेसल्याचे दिसत आहे. नीता अंबानी यांचा हा व्हिडीओ गणपती विसर्जनचा आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक लोक तिथे पोहोचले होते. काही लोक नीता अंबानी यांना पाहण्यासाठी पोहोचले होते. बाप्पाला निरोप देताना देखील गर्दी केली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ओरहान अवात्रामणिनं अंबानीच्या गणपती विसर्जनचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून फोटो शेअर केले. फोटोत ओरीनं निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्यानं हा फोटो बाप्पाच्या समोर पोज देत काढले. ओरीनं शेअर केलेल्या फोटोत एंटीलियाचा राजा असं लिहिल्याचे दिसत आहेत. ओरीनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये गणपती बाप्पाची मोठी मूर्ती देखील पाहायला मिळत आहे. त्या मुर्तीला सुंदर पद्धतीनं सजवलं आहे. 

ओरीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चेंटही नाचताना दिसली आहे. त्याशिवाय यावेळी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरही तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत दिसली. त्या दोघांचे फोटो देखील व्हायरल झाले आहे. त्यानंतर त्यांनी ढोल ताशावर डान्स देखील केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : अनुष्का शर्माची पीआर होती परिणीती चोप्रा, असा मिळाला 3 महिन्यात बिग ब्रेक!

अंबानी यांच्या गणपतीला शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबानं हजेरी लावली होती. तर त्यांच्यासोबत सलमान खान देखील दिसला होता. सलमान खान त्याच्या भाचीसोबत दिसला होता. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. इतकंच नाही तर त्यांच्याशिवाय इतर राजकारणातील लोकांनी देखील हजेरी लावली होती.