प्रसिद्ध अभिनेत्री एमी जॅक्सनची अवस्था वाईट; ओळखणंही झालं कठिण

'भोली सी सूरत, आँखों में मस्ती, आये हाये...' हे गाणं अभिनेत्री एमी जॅक्सनला खूप शोभतं. हिंदी व्यतिरिक्त तिने तामिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

Updated: Sep 22, 2023, 07:29 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्री एमी जॅक्सनची अवस्था वाईट; ओळखणंही झालं कठिण title=

Amy Jackson Photos : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन तिच्या मनमोहक फोटोंनी लोकांना आश्चर्यचकित करत असते. एकेकाळी आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाणारी एमी आज तिच्या बदललेल्या चेहऱ्यामुळे ट्रोल होत आहे. एमीने तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोंद्वारे तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

'भोली सी सूरत, आँखों में मस्ती, आये हाये...' हे गाणं अभिनेत्री एमी जॅक्सनला खूप शोभतं. हिंदी व्यतिरिक्त तिने तामिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रजनीकांतच्या '2.0' मधील तिचे सौंदर्य सर्वांनाच आवडलं. पण आता तिचा असा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तिला ओळखणंही कठीण झालं आहे. युजर्सचं म्हणणं आहे की, ती एमीसारखी कमी आणि 'ओपेनहायमर' अभिनेता सिलियन मर्फीसारखी दिसतेय.

एमी जॅक्सनने काही तासांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती हुबेहूब Cillian Murphy सारखी दिसतेय, अशी कमेंट बहुतेकांनी तिच्या या फोटोवर केली आहे.  या फोटोंमध्ये Amy Jackson ला ओळखणंही अवघड झालं आहे. तिचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना तिचा जुना सुंदर चेहरा आठवत आहे.

लंडनमध्ये राहतेय अभिनेत्री 
एमीने 2011 मध्ये 'एक दीवाना था' हा सिनेमा साइन केला होता, जो एका वर्षानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रतीक बब्बरही त्यात मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट आवडला आणि एमीच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं. यादरम्यान एमी आणि प्रतीक रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. एमी 2015 पर्यंत भारतात राहिली. यानंतर ती इंग्लंडला शिफ्ट झाली आणि आता लंडनमध्ये राहतेय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

31 वर्षीय अॅमीने खुलासा केला होता की, ती जॉर्ज पनायोटोला डेट करत आहे. 2019 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. नंतर या जोडप्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2022 मध्ये एमीने एड वेस्टविकला डेट करायला सुरुवात केली.