मुंबईच्या या सर्वसामान्य रेस्टॉरेंटला अंबानी कुटुंबाची पसंती, नाव ऐकून चकीत व्हाल!

या ठिकाणी मिळाणारे पदार्थचं या रेस्टॉरेंटची खासियत आहे. 

Updated: Feb 15, 2022, 12:45 PM IST
 मुंबईच्या या सर्वसामान्य रेस्टॉरेंटला अंबानी कुटुंबाची पसंती, नाव ऐकून चकीत व्हाल! title=

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या फॅमिलीबद्दल जाणून घेण्यात अनेकांना उत्सुकता असते. ते कशा प्रकारचं जीवन जगतात. त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे देखील जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुकत असतात. आता या रिपोर्टमध्ये अंबानी कुटुंब मुंबईतील कोणत्या रेस्टॉरेंटमध्ये जाणं पसंत करत हे कळणार आहे.

मुंबईच्या  'स्वाति' या प्रसिद्ध रेस्टॉरेंटच्या मालकिण आशा झवेरी या आहेत. त्यांनी एका मुलाखतीत या रेस्टॉरेंटची वैशिष्ट्ये सांगितली आहे.

यावेळी त्यांनी त्यांची स्पेशल डिश पेरू-नुशा आणि मेथीची चपती यांचं कॉम्बिनेशन कसं केलं याबाबत देखील सांगितलं आहे. पेरू-नुशा हा पेरूपासून बनवला जाणारा पदार्थ असून जैन समाजात तो लोकप्रिय आहे. त्याच वेळी, मेथीचा स्वतःचा एक विशेष कडूपणा असतो आणि ही खासियत गोड करीशी परिपूर्ण जुळते.

आशिया खंडातील सर्वात श्रींमत व्यक्ती कोणत्या हॉटेलमध्ये खाद्य पदार्थांचा आनंद घेणं पसंत करतं, त्याबाबत कळताच सगळेच आर्श्चयचकीत झाले. या हॉटेलचं नाव तेव्हा समोर आलं जेव्हा मुकेश अंबानी यांनी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ते म्हणाले, की आठवड्यातून किमान एक वेळा तरी आम्ही स्वाती रेस्टॉरेंटमध्ये 

जेवायला जातो. यावरुन अंबानी फॅमिलीचं हे फेवरेट हॉटेल असल्याचं सगळ्यांना कळलं. या रेस्टॉरेंटमध्ये अगदी हटके पद्धतीचे पदार्थ मिळतात. आणि या ठिकाणी मिळाणारे पदार्थचं या रेस्टॉरेंटची खासियत आहे.