मुंबई : 'पुष्पा' या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या आणि पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटांचा डंका साऱ्या जगात वाजवणाऱ्या अल्लू अर्जुन यानं सर्वांनाच बेभान केलं. एक खांदा वर करत, हनुवटीखालून हात फिरवत येणारा पुष्पा अजूनही कोणी विरसलेलं नाही. (Allu Arjun Pushpa)
या चित्रपटाचं वेड त्याचा दुसरा भाग येईपर्यंत कायम राहील, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
अशातच आता अल्लू अर्जुनचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो दमदार अॅक्शन सीन करताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर, त्याची डायलगबाजीसुद्धा इथं पाहायला मिळत आहे.
एकिक़डे अल्लू अर्जुनचा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच दुसरीकड़े मात्र त्याच्यावर टीकेची झोडही उठवली जात आहे.
बरं ही टीका करणारे, कोण तर त्याचेच हक्काचे चाहते. साडेतीनशे कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा चेहरा असणाऱ्या अल्लू अर्जुन याच्यावर चाहते नेमके का भडकले माहितीये ?
तर, एका जाहिरातीतून तो झळकला. इथे तो अॅक्शन सीन करतो, पण या अॅक्शन सीनमध्ये स्लोमोशन मध्ये खाली येणाऱ्या अभिनेता जेव्हा त्याला लवकर कर, असं म्हणतो तिथेच तो जरा चूक करतो.
हा साऊथ सिनेमा आहे..... असं तो मह्णताना दिसतो. आता अल्लू अर्जुन हे जाहिरातीच्याच निमित्ताने म्हणाला. पण, ही घोडचूक झाली अशीच वागणूक आता त्याला चाहते देत आहेत.
manasu korithe, thaggedele! @alluarjun pic.twitter.com/i30UGZEQKD
— zomato (@zomato) February 4, 2022
Shameful #zomato @alluarjun
Cheap comments on South Cinema...
— Kumar (@megafan_kumar) February 4, 2022
just a "fake" hit in North & you're trolling south movies? don't forget your roots Mr. @alluarjun
— (@urstrulyssmb__) February 4, 2022
@alluarjun is in a place from where he should take responsibility while doing ad.
Demeaning a whole industry for the sake of money is just shame.
Please stop ruining the name of south industry .
South industry needs sorry from zomato and #Alluarjun#AlluArjun #Zomato— NEWTON (@odisha_prabhas) February 4, 2022
तुझ्या पिढ्या, तुढी पाळंमुळं इथूनच आहेत असं म्हणत दाक्षिणात्य सिनेमाची खिल्ली उडवूच कसा शकतोस असा खडा सवाल त्याला काहीजणांनी विचारला आहे.
सहसा प्रेक्षकांमध्ये आपली चांगली प्रतिमा असणारा अल्लू अर्जुन यावेळी काहीसा वाट भरकटला. आता याबाबत त्याचं काय म्हणणं, हे पाहणं औत्सुक्याचं असेल.