Pushpa सिनेमासाठी अल्लू अर्जुन पहिली निवड नव्हताच, कारण...

 बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी दाखवत, पुष्पा: द राइजने लाखो लोकांना वेड लावले आहे.

Updated: Jan 29, 2022, 05:10 PM IST
Pushpa सिनेमासाठी अल्लू अर्जुन पहिली निवड नव्हताच, कारण... title=

मुंबई : बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी दाखवत, पुष्पा: द राइजने लाखो लोकांना वेड लावले आहे. चित्रपटातील संवाद आणि गाणी लोकांच्या जिभेवर गेली आहेत. पुष्पा चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा जीव ओतला आहे. पुष्पाची कथा, गाणी, संवाद आणि पात्रांनी प्रेक्षकांवर जादू केली आहे.

'पुष्पा'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणारे अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना यांच्यासह समंथा रुथ प्रभूच्या आयटम साँगने ही सर्वांनाच थक्क केले आहे. या स्टार्सची लोकप्रियता एका रात्रीत चौपट झाली आहे, पण पुष्पासाठी यातील काही कलाकार पहिली पसंती पसंती नव्हते.

पुष्पासाठी मेकर्सनी अनेक स्टार्सशी संपर्क साधला होता. त्या सेलेब्सच्या नकारानंतर अल्लू अर्जुन, रश्मिका आणि समंथा यांच्याकडे हा चित्रपट आला.. या बदलानंतर काय परिणाम झाला हे आपल्या सर्वांना माहीत आहे.

Forbes India - Mahesh Babu: When Heroes Get Real

चर्चा आहे की, निर्मात्यांनी अल्लू अर्जुनला नव्हे तर पुष्पासाठी महेश बाबूशी संपर्क साधला होता. महेश बाबू या चित्रपटातील ग्रे शेड्सच्या भूमिकेसाठी तयार नव्हते, त्यामुळेच त्यांनी हा चित्रपट नाकारला होता. महेश बाबूने चित्रपट नाकारण्यामागे स्वत:ची काही कारणे होती.