मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'पुष्पा' (Pushpa The Rise) या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच जादू दाखवण्यास सुरुवात केली. चित्रपटाच्या कथानकापासून ते अगदी त्यातील प्रत्येक भूमिकेपर्यंत प्रत्येक घटकाला चाहत्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.
इतकंच काय, तर चित्रपटाचे डायलॉग तर तुफान व्हायरल झाले. विविधभाषी 'पुष्पा'च्या गाण्यांचा प्रभाव तर सांगावा तितका कमीच. 'श्रीवल्ली' (Srivalli), 'ऊं अंटावा', 'सामी सामी' आणि 'ये मेरा अड्डा' ही गाणी तर प्रत्येकाच्या तोंडी, मोबाईलमध्ये, रिलमध्ये आणि रिंगटोनवर आली.
याच गाण्यांपैकी गाजलेल्या 'श्रीवल्ली'चे नानाविध वर्जनही आपल्याला पाहायला मिळाले. मुख्य म्हणजे या एका चित्रपटानं बरेच सोशल मीडिया युजर, व्लॉगरही रातोरात स्टार झाले.
सिड श्रीराम यानं गायलेल्या ज्या 'श्रीवल्ली' गाण्यानं त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली, त्या गाण्यात आधी 'श्रीदेवी' हा शद्ब ठेवला जाणार होता. पण, अखेर श्रीवल्लीनं जादू केली आणि आपण सर्वजण याचे साक्षीदार झालो.
'श्रीवल्ली' गाणं गाजलं खरं पण ते म्हणण्याचा आणि त्यामागचा अर्थ जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का?
आधी पूर्ण गाणं वाचा...
नजरें मिलते ही नजरों से
नजरों को चुराए
कैसी यह हया तेरी
जो तू पलकों को झुकाए
रब्ब जो पोषीदा है
उसको निहारे तू
और जो गर्वीदा है
उसको टाले तू
तेरी झलक अशरफी श्रीवल्ली
नैना मादक बरफी
तेरी झलक अशरफी श्रीवल्ली
बातें करे दो हरफी
ह्म.. सारा ज़माना
है मेरे पीछे
पर यह दीवाना
है तेरे पीछे
सर यह झुकने ना दू
दुनिया के आगे
पर तेरी पायल देखूं
कर के सर नीचे
ना तमन्ना हीरा पन्ना
मुझको है बस तेरा बनना
एक झलक तेरी आँखो में
ख्वाब सज़ा जाए
तेरी झलक अशरफ़ी श्रीवल्ली
नैना मादक बरफी
तेरी झलक अशरफ़ी श्रीवल्ली
बातें करे दो हरफी
लाई लाई लगा लाई लाई
लाई लाई लगा लाई लाई..
तेरी सहेलियां सदा मामूली
उसके मुक़ाबले थोड़ी तू भली
जैसे ही सोलवा चढ़ जाए सावन
तू क्या हर लड़की दिखे फूलों की कली
बांस पे लिपटी लाल साड़ी
वो भी दिखे राज कुमारी
झुमके बिंदी और गजरे से
रूप निखर जाए फिर भी
तेरी झलक अशरफ़ी श्रीवल्ली
नैना मादक बरफी
तेरी झलक अशरफ़ी श्रीवल्ली
बातें करे दो हरफी...
श्रीवल्ली गाणं आता तुम्ही ऐकण्यासोबतच वाचलंही असेल. तर यामध्ये बऱ्याचदा वापरलेल्या गेलेल्या अशरफी, या शब्दाचा अर्थ आहे सोन्याचं नाणं. आता तुम्ही म्हणाल ही श्रीवल्ली कोण? तर, ही श्रीवल्ली म्हणजे पुष्पा जिच्यावर भाळला आहे ती तरुणी.
या श्रीवल्लीचं प्रशंसा करताना, तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त करताना पुष्पा नेमका कसा व्यक्त होतोय हेच या गाण्यातून सांगण्यात आलं आहे. अतिशय सोप्या तरीही तितक्याच प्रभावी अशा शब्दांची मांडणी या गाण्याच्या निमित्तानं पाहायला मिळाली.