पुष्पाच्या 'त्या' लोकप्रिय स्टाईलमागचं रहस्य अखेर समोर... खुद्द अल्लू अर्जूनकडून खुलासा!!!

'श्रीवल्ली' या गाण्याने तर सगळ्यांचीच मने जिंकून घेतली आहेत. 

Updated: Jul 17, 2022, 10:07 PM IST
पुष्पाच्या 'त्या' लोकप्रिय स्टाईलमागचं रहस्य अखेर समोर... खुद्द अल्लू अर्जूनकडून खुलासा!!! title=

मुंबईः अल्लू अर्जूनचा 'पुष्पा द राईझ' हा एक ब्लॉकबस्टर पिक्चर होता. गाणी, डान्स आणि डायलॉग्सपासून पुष्पाचे सर्वच काही हटके होते. त्यातून अल्लू अर्जूनचा 'फ्लावर नहीं पावर हैं हम' हा डायलॉगही खूप फेमस झाला आहे. 'श्रीवल्ली' या गाण्याने तर सगळ्यांचीच मने जिंकून घेतली आहेत. 

'पुष्पा' या गाण्यातील अल्लू अर्जूनचा तो आयकॉनिक वॉल आजही त्याच्या चाहत्यांना भुरळ घातलो कारण अशा पद्धतीचा अतरंगी डान्स कधीच कोणी केला नव्हता...त्यावर हजारो लोकांनी मीम्सही बनवले आणि त्यावर रिल्सही झाले. 'नाटू नाटू' या गाण्यापेक्षा 'पुष्पा'च्या 'श्रीवल्ली' गाण्यानेच पुरता धुमाकूळ घातला. 

पण ही स्टाईल किंवा हा वॉक अल्लू अर्जूनने केला कसा? याहीपेक्षा तो आला कसा?, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि त्यामुळे अल्लूला अनेक जणांनी प्रश्न विचारले आहेत. शेवटी यावरील अल्लूने आपले मौन बाजूला सारले असून त्यावर आता त्याने स्वतःहून खुलासा केला आहे. 

एका मुलाखतीच्या दरम्यानच अल्लूने असे सांगितले की, ही वॉकची आयाडिया दिग्दर्शक सुकूमार यांचीच होती. ते म्हणाले की तूम्ही कसे चालता हे मला माहित नाही पण सगळ्यांना तूमच्यासारखेच चालावे लागेल असं काहीतरी आपण इन्वेंट करूया. तेव्हाच त्यांना स्लोपिंग शोल्डर बॉडी लँग्वेजची आयडिया सुचली आणि त्यावरच आम्ही काम करायचे ठरवले आणि शेवटी ती स्टाईल भलतीच फेमस झाली. 

अल्लू अर्जुनची चालण्याची शैली आणि श्रीवल्ली या गाण्यातील त्याची हुक स्टेप इंटरनेटवर व्हायरल झाली होती. फक्त त्याची चालण्याची शैलीच नाही, तर 'मैं झुकेगा नही साला' आणि 'पुष्पा फूल नहीं, आग है' असे संवाद म्हणताना पुष्पा करत असलेले हाताचे हावभाव देखील व्हायरल झाले आहेत आणि लोक अजूनही ते फोलो करतात.

या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर सुमारे 365 कोटी रुपयांची कमाई केली. "पुष्पा: द रुल" नावाच्या पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण ऑगस्टमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि त्यात पुन्हा एकदा अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहद फासिल आणि अनसूया भारद्वाज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.