Allu Arjun ला फॅनकडून भेट म्हणून मिळाली "बंदूक"

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन नुकताच UAE च्या दौऱ्यावर गेला होता. 

Updated: Sep 30, 2021, 04:06 PM IST
Allu Arjun ला फॅनकडून भेट म्हणून मिळाली "बंदूक" title=

मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन नुकताच UAE च्या दौऱ्यावर गेला होता. या दरम्यान, तिथून परतताना, त्याला अशी भेट मिळाली, ज्यामुळे या अभिनेत्याची पिकनीक संस्मरणीय झाली. वास्तविक, अल्लू अर्जुनला त्याच्या एका व्यावसायिक चाहत्याने 160 वर्षांची पिस्तूल भेट दिली होती.

अल्लू अर्जुनला पिस्तूल भेट मिळण्यामागे विशेष कारण 

मल्याळी व्यापारी रियाज किल्टनने अभिनेत्याला 160 वर्षांची पिस्तूल भेट देऊन आश्चर्यचकित केले. या विंटेज पिस्तुलसह अभिनेत्याचा फोटो खूप पसंत केला जात आहे.

ही पिस्तूल भेट देताना, अल्लू अर्जुनची व्यावसायिकासोबतचे फोटो  सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. केरळमध्ये अल्लूचे भक्कम चाहते आहेत. अल्लूची गाणी असोत किंवा चित्रपट असो, केरळमधील अभिनेत्याचे चाहते ते जोरदारपणे सेलिब्रेट करतात