'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातून या अभिनेत्यासोबत आलियाचा किसिंग सीन हटवला

'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातून किसिंग सीन हटवण्यामागचं मोठं कारण आलं समोर

Updated: Sep 2, 2021, 10:26 AM IST
'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातून या अभिनेत्यासोबत आलियाचा किसिंग सीन हटवला title=

मुंबई : ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित संजय लीला भंसाळी निर्मित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताचं प्रेक्षकांनी ट्रेलरला डोक्यावर घेतलं. या चित्रपटाच्या माध्यमातून आलियाच्या चाहत्यांना तिचं एक वेगळ रूप पाहाता येणार आहे. आलियामधील गंगूला रूपरी पडद्यावर पाहायला प्रेक्षक प्रतीक्षेत आहे. पण चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भंसाळींनी चित्रपटाबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. 
 
रिपोर्टनुसार चित्रपटात अभिनेता शांतनू माहेश्वरी, आलियाच्या प्रेमीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात शांतनूसोबत असलेला इंटिमेट सीन दिग्दर्शकांनी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट कोरोना काळाच चित्रीत झाल्यामुळे कोरोनाचे प्रोटोकॉल लक्षात घेत शांतनू आणि आलियाचा इंटिमेट सीन हटवण्यात आला आहे. 

कोण आहेत गंगूबाई?
गंगुबाई यांना लहान वयातच वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं. वेश्याव्यवसाय करत असताना त्यांची अनेक कुख्यात गुंडांसोबत ओळख झाली होती. हे सारं काही ‘गंगुबाई काठीयावाडी’ या सिनेमात दाखविण्यात येणार आहे. संजय लीला भंसाळीचा हा चित्रपट आलियाच्या करिअरमधील एक मायलस्टोन ठरेल असंच दिसत आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया पहिल्यांदाच अशी भूमिका साकारणार आहे. कामाठीपुऱ्यामधील विशेष चर्चिल्या गेलेल्या गंगुबाई यांच्या जीवनावर आधारीत गंगुबाई काठियावाडी या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच या सिनेमाबाबतची उत्सूकता वाढली आहे.