KBC 13: या स्पर्धकाला उघडायचे हे रेस्टॉरंट, या रकमेत होईल का स्वप्न पूर्ण!

'KBC' मध्ये जिंकलेली रक्कम या स्पर्धकाचे स्वप्न करेल पूर्ण?

Updated: Sep 2, 2021, 09:28 AM IST
KBC 13: या स्पर्धकाला उघडायचे हे रेस्टॉरंट, या रकमेत होईल का स्वप्न पूर्ण! title=

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन सध्या 'कोन बनेगा करोडपती 13' मध्ये व्यस्त आहेत. प्रश्न-उत्तरांच्या या खेळात अनेक लोक आपलं नशिब आजमावण्यासाठी येत असतात. एका प्रश्नाचं उत्तर देवून भरपूर पैसे कमावण्याची संधी या शोने अनेकांना दिली आहे. हिमानी बुंदेलनंतर आणखी एका स्पर्धकाचं स्वप्न केबीसीमुळे पूर्ण होवू  शकतं. या स्पर्धकाचं नाव आहे अमन बाजपायी. अमनचं शहरात स्वतःचं एक  रेस्टॉरंट असावं असं स्वप्न आहे.  आर्थिक अडचणींमुळे मी शोमध्ये आलो असं अमनचं म्हणणं आहे.

अमन म्हणाला, 'मी समाजशास्त्रमध्ये MA करत आहे. मला एक चीनी  रेस्टॉरंट सुरू करायचं आहे. माझी आई मला मगरमच्छ बोलते.  कारण मी फार आळशी आहे आणि पूर्ण दिवस फक्त खात असतो.' शिवाय जेव्हा हॉटेल सुरू होईल तेव्हा बिग बीनां  रेस्टॉरंटच्या ओपनिंग सेरेमनीला  बोलावण्याची अमनची इच्छा आहे. 

अमनने जिंकले एवढे रूपये
बिग बींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत अमनने 12 लाख 50 हजार रूपये जिंकले. आता अमन एक हॉटेल सुरू करू शकतो की नाही हे फक्त येणारा काळचं ठरवेल. एवढंच नाही तर अमनला वडिलांसाठी चारचाकी वाहन आणि आईसाठी एक साडी घ्यायची आहे.