Alia Bhatt Video: लग्नानंतर आठवड्याभरातच आलियाकडे Good News

लग्नानंतर काही दिवसांतचं आलियाने चाहत्यांसोबत शेअर केली Good News... व्हिडीओ व्हायरल   

Updated: Apr 27, 2022, 11:17 AM IST
Alia Bhatt Video: लग्नानंतर आठवड्याभरातच आलियाकडे Good News title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरने 14 एप्रिल रोजी कुटुंब आणि खास मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं. अत्यंत गुपीत ठेवण्यात आलेल्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र फ्कत आणि फक्त आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा होती. फक्त बॉलिवूडनेचं नाही, तर अनेकांनी दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. आता लग्नानंतर आलियाने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

आलियाच्या आयुष्यातील ही गूडन्यूज जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहेत. आलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाने अनेकांच्या मनात  राज्य केलं... सिनेमातील आलियाच्या अभिनयाचं सर्वचं स्तरातून कौतुक झालं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला पार केल्यानंतर आता चाहत्यांना सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहाता येणार आहे. आलियाने नुकताचं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 
 
व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'गंगूबाई काठियावाडी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे...' असं लिहिलं आहे. सध्या आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.