राहाच्या जन्मानंतर Alia Bhatt चं करिअर येणार स्लो ट्रॅकवर? अभिनेत्रीचा खुलासा

Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी राहाच्या जन्मानंतप तिच्या करिअरवर आलियानं स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Updated: Feb 1, 2023, 10:51 AM IST
राहाच्या जन्मानंतर Alia Bhatt चं करिअर येणार स्लो ट्रॅकवर? अभिनेत्रीचा खुलासा title=

Alia Bhatt On Her Career After Raha's Birth : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आलिया आई झाली असून मातृत्वाचा आनंद घेत आहे. आलियानं  नोव्हेंबर 2022 मध्ये मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीरच्या (Ranbir Kapoor) मुलीचे नाव राहा आहे. राहाच्या जन्मानंतर ते दोघेही तिच्यासोबत जितका मिळेल तितका वेळ व्यथित करताना दिसत आहेत. सध्या राहाच्या जन्मानंतरच्या काळाचा आनंद आलिया घेत आहे. नुकतीच आलियानं मुंबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी लेक आणि करिअर अशा दोन्ही गोष्टींविषयी आलिया बोलताना दिसली. 

या कार्यक्रमात आलियाला काही पत्रकारांनी राहाच्या जन्मानंतर तिच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो का? त्यावर उत्तर देत आलिया म्हणाली की हे शक्य आहे. दरम्यान, तिच्यासोबत या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वरुण धवनने (Varun Dhawan) सांगितले की, "तिचं करिअर कधीच स्लो स्पीडवर चालणार नाही." पण नंतर आलियानं स्पष्ट केलं की तिचं पहिले प्राधान्य तिची लेक राहा आहे आणि जर चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर ती चित्रपटांच्या संख्येपेक्षा चित्रपटाचा क्वालिटीला प्राधान्य देते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याविषयी बोलताना आलिया पुढे म्हणाली, "माझ्या आयुष्यातील सगळ्यात पहिली प्रायॉरिटी ही माझी मुलगी आहे. तिच्यावर माझे खूप प्रेम आहे. पण माझे पहिले प्रेम चित्रपट आहे आणि ते माझे काम देखील आहे. त्यामुळे मी प्रयत्न करेन. कदाचित येणाऱ्या काळात माझे काम ही क्वांटीटी पेक्षा क्वालिटीला प्राधान्य देणारे असू शकते आणि ही काही चुकीची गोष्ट नाही." 

राहाला पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागेल इतक्या वर्षांची प्रतिक्षा

'आम्हाला माहिती आहे की, हे तुमचं रोजचं काम आहे. आम्हालाही तुमची तितकीच गरज आहे, जितकी तुम्हाला आमची गरज असते. पण काहीही करा 'राहा'चा चेहरा समोर येता कामा नये. त्या जागी वडा पाव आणि भजी लावा. आमची विनंती आहे चुकूननही राहाचा चेहरा दिसता कामा नये. फ्रेममध्ये असल्यास तिला कृपया दाखवू नका. आई-वडील म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे,' असं आलियाने पापाराझींना सांगितलं.

हेही वाचा : Alia Bhatt प्रेग्नंसीनंतरही इतकी सुंदर, राहाच्या जन्मानंतर Alia Bhatt अशी ठेवते त्वचेची काळजी!

'आम्हाला राहाचा चेहरा दाखवयचा नाही असं काही नाही. पण सध्या ती लहान आहे. अशात किमान दो वर्षे तरी तिला या जगापासून दूर राहू द्या. दोन वर्षानंतर आम्हीच तिला तुमच्यासमोर आणू. आई वडील म्हणून सध्या आम्हाला तिची काळजी आहे', असं देखील आलिया आणि रणबीरनं सांगितलं. दुसरीकडे या मीटिंगमध्ये सर्व पापाराझींना राहा कपूरचा फोटो दाखवला. पण त्यानंतर फोटो काढण्यास सक्त मनाई केली.