Ranbir Alia Wedding : लग्नानंतर आलियाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड

रणबीरसोबत लग्न झाल्यानंतर का होताय आलियाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड, कोणता आहे तो व्हिडीओ?  

Updated: Apr 15, 2022, 11:15 AM IST
Ranbir Alia Wedding : लग्नानंतर आलियाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड title=

मुंबई : अखेर अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचं लग्न झालं. गुरूवारी दोघांनी कुटुंब आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं. आलियाच्या लग्ना दरम्यान तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला तो म्हणजे 'राजी' सिनेमातील 'मुड के ना देखो दिलबरो...' गाण्याचा... जेव्हा पहिल्यांदा हे गाणं चाहत्यांच्या भेटीस आलं, तेव्हा अनेकांनी गाण्याला पसंती दर्शवली... पण आलियाच्या लग्नानंतर मात्र गाण्याला युट्यूब 320 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळालं आहे. सध्या आलियाचं हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 

'मुड के ना देखो दिलबरो...' या गाण्यामुळे प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं असेल. जेव्हा आलियाची गुरूवारी सासरी पाठवणी करण्यात आली तेव्हा 'दिलबरो...' गाणं सर्वत्र ऐकू येत होतं. 

महत्त्वाचं म्हणजे सोनी राजदान आलियाची पहिल्यांदा नाही, तर दुसऱ्यांदा पाठवणी करणार आहेत. पहिल्यांदा रिल लाईफमध्ये आलियाची पाठवणी करण्यात आली, आता दुसऱ्यांदा रिअल लाईफमध्ये आलियाची आई लेकीला सासरी पाठवलं आहे. 

'राझी' सिनेमात पहिल्यांदा आलियाची पाठवणी करण्यात आली. 'राझी' सिनेमात आलियाने सहमत, तर सोनी राजदान यांनी तेजी खानच्या भूमिकेला न्याय दिला.