'आशिकी ३'मध्ये दिसणार सिद्धार्थ आणि आलिया?

सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांनी आपल्या नात्याबद्दल खुलासा केला नसला तरी मोठ्य़ा पडद्यावर या दोघांच्या जोडीला पाहणे त्यांच्या चाहत्यांना आवडतेच.

Updated: Jun 23, 2017, 09:01 PM IST
'आशिकी ३'मध्ये दिसणार सिद्धार्थ आणि आलिया? title=

मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांनी आपल्या नात्याबद्दल खुलासा केला नसला तरी मोठ्य़ा पडद्यावर या दोघांच्या जोडीला पाहणे त्यांच्या चाहत्यांना आवडतेच.

स्टुडंट ऑफ दी ईयर आणि कपूर अँड सन्स या दोन सिनेमांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते. आता आशिकी ३मध्येही ही जो़डी दिसणार असल्याचे बोलले जातेय.

सूत्रांच्या माहितीनुसार, आलिया-सिद्धार्थ हल्ली मोहित सुरी यांच्या ऑफिसमध्ये सतत येत जात असतात. आलिया सध्या राजी या मेघना गुलजार यांच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थ अय्यारी या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.