सुयश - अक्षयाने केला गुपचूप साखरपुडा

2017 हे वर्ष मराठी कलाकारांच्या लग्नासाठी खास वर्ष ठरलं. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 3, 2018, 06:06 PM IST
सुयश - अक्षयाने केला गुपचूप साखरपुडा  title=

मुंबई : 2017 हे वर्ष मराठी कलाकारांच्या लग्नासाठी खास वर्ष ठरलं. 

आता 2018 च्या सुरूवातीलाच साखरपुड्याची बातमी घेऊन सुशांत आणि अक्षया आले आहेत. तुझ्यात जीव रंगला फेम पाठकबाई म्हणजे अक्षया देवधर आणि सुयश टिळक या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला आहे. 

अक्षया आणि सुयश कायमच आपले फोटो शेअर करत असतात. मात्र आताचा त्यांचा फोटो थोडा खास आहे. त्याला कारणही तसंच आहे. या फोटोत अक्षयाच्या बोटात अंगठी दिसत आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. अक्षया आणि सुयश सुरूवातीपासूनच त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण असं सगळं असताना आताचा फोटो खास आहे.

सुयश टिळकने नुकताच त्याच्या फॅन्सला नववर्षाच्या शुभेच्छा देत एक फोटो शेअर केला आहे. त्यात सुयशच्या गळ्यात हात टाकून अक्षयाचा फोटो आहे. या फोटोमध्ये अक्षयाच्या हातात हिऱ्याची एक अंगठी दिसत आहे. या फोटोवरुन अक्षया-सुयश यांनी नव्या वर्षात गुपचूप साखरपुडा केला की काय अशी चर्चा होत आहे. या दोघांनी पाडवा हा नवरा-बायकोचा खास सणही सोबत सेलिब्रेट केला होता. तेव्हाच यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले होते. आता यातील नेमके खरे काय आणि खोटे काय हे येणारी वेळच सांगेल.

पण या दोघांच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. त्यांचा खरंच साखरपुडा झाला आहे की नाही हे मात्र अद्याप कळलेल नाही.