पद्मावत सिनेमासोबत अक्षयच्या पॅडमॅन सिनेमाची टक्कर

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याची तयारी सेन्सॉर बोर्डाने दाखवली आहे.

Updated: Jan 5, 2018, 06:35 PM IST
पद्मावत सिनेमासोबत अक्षयच्या पॅडमॅन सिनेमाची टक्कर title=

मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याची तयारी सेन्सॉर बोर्डाने दाखवली आहे.

सिनेमाचं नाव बदलण्याची सूचना सेन्सॉरने दिली असून काही बदलही निर्मात्यांना सांगितले आहे. त्यामुळे 'पद्मावती'चा प्रदर्शनाचा मार्ग आता सूकर झाला असून हा सिनेमा आता 26 जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. जर असं झालं तर अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' या सिनेमाशी 'पद्मावती'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर होईल.

पॅडमॅन आणि पद्मावतची टक्कर 

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार स्टारर पॅडमॅन या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आलीये..आधी हा सिनेमा 26 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचं निर्मात्यांनी जाहीर केलं आहे. हा चित्रपट खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी पॅड्स तयार करणाऱ्या कोईमतूर येथील अरुणाचलम् मुरुगानंथम यांच्या जीवनावर आधारित आहे. अक्षयची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्नाने या सिनेमाची निर्मित केली आहे.