100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला अक्षय कुमारचा गोल्ड सिनेमा

गोल्ड सिनेमाची बॉक्स ऑफीसवर मोठी कमाई

Updated: Aug 28, 2018, 04:46 PM IST
100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला अक्षय कुमारचा गोल्ड सिनेमा title=

मुंबई : भारतीय सिनेमातील सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारचा गोल्ड सिनेमा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रिलीज झाला. जवळपास 85 कोटींमध्ये हा सिनेमा बनला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

गोल्ड बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. गोल्ड सिनेमा या वर्षीचा आठवा सिनेमा आहे ज्याने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. पद्मावत, सोनू के टीटू की स्वीटी, रेड, बागी-2, राजी, रेस-3 आणि संजू या सिनेमांनी 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

अक्षय कुमार आणि टीव्ही अॅक्ट्रेस मौनी रॉय या सिनेमामध्ये लीड रोलमध्ये आहे. दिग्दर्शक रिमा कागती यांच्या या सिनेमातून मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सिनेमाने ओपनिंग डेला 25.25 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी वर्किंग डे असल्यामुळे सिनेमाची इतकी कमाई नाही झाली. पण सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला.