मराठी सिनेमात अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

मोठी घोषणा - मराठी सिनेमात अक्षय कुमारची वर्णी

Updated: Nov 2, 2022, 09:19 PM IST
मराठी सिनेमात अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ सिनेमाच्या रूपाने पुन्हा एकदा मोठ्या पडदयावर येत आहे. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटनांवर आधारीत सिनेमे बनवून एक इतिहास घडवला आहे. ऐतिहासिक सिनेमांची ही परंपरा गेल्या काही वर्षात पुन्हा जपली जात आहे. शिवकाळातील एक पराक्रमी पान उलगडण्यासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पाऊल पुढे टाकलं आहे. शिवकाळातील सात वीरांचे महत्त्व सिनेमातून मांडण्यात येणार आहे.

आज म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी  वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचा शुभारंभ प्रयोग पार पडत आहे. या सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 

या कार्यक्रमाला मा. मुख्यमंत्री महोदय आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित आहेत. याच बरोबर या सिनेमातीसल कलाकार मंडळीही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.  यांचे बुधवार 2 नोव्हेंबर 2022 रोजीचे कार्यक्रम

याच सात वीरांच्या शौर्यावर महेश मांजरेकर यांच्या नव्या सिनेमाची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. सध्या शिवकालीन सिनेमांचा ट्रेंड जोरात सुरू आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फत्ते शिकस्त, फर्जंद, पावनखिंड, शेर शिवराज या सिनेमांना मिळालेल्या यशामुळे प्रेक्षकांना शिवकाळातील सिनेमा आवडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच महेश मांजरेकर यांच्या वीर दौडले सात या सिनेमाच्या घोषणेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.