५०व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने केली आहेत ही खास ७ ट्विट्स

हॅप्पी बर्थ डे अक्षयकुमार 

Updated: Sep 9, 2017, 10:22 AM IST
५०व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने केली आहेत ही खास ७ ट्विट्स  title=

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचा खिलाडी अक्षय कुमार आज ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षयला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या फॅन्सप्रमाणेच कलाकारांनीही ट्विटरवर खास संदेश आणि फोटो पाठवले आहेत. आज सकाळ पासूनच #HappyBirthdayAkshayKumar हा खास हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे. 

अक्षय कुमारनेही त्याच्या ५० व्या वाढदिवसादिवशी काही खास ट्विट केले आहेत. अक्षयला या जगात येऊन किती दिवस, तास, महिने, वर्ष झालेत याचे खास तपशील त्याने ट्विटमध्ये टाकले आहेत.  

 

अक्षयने केलेल्या ट्वीटनुसार 2,62,80,000 मिनटं, 4,38,000 तास, 18,250 दिवस, 20607 आठवडे, 600 महिने आणि 5 दशकं झाली आहेत. या ट्विटच्या सोबतीने अक्षयने त्याच्या आगामी चित्रपटाचे एक पोस्टर रिलिज केले आहे. 

 

'गोल्ड ' हा अक्षयचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या पोस्टरप्रमाणे त्याने काही खास संदेश लिहले आहेत.  ' प्रत्येक काळ्या ढगाला चंदेरी किनार असते, पण  तुमच्या प्रेमामुळे माझी ही किनार सोनारी झाली आहे. अगदी माझ्या वयाप्रमाणे.  या वर्षी अक्षय कुमारचे दोन चित्रपट रिलीज झाले. 'जॉली एलएलबी 2' आणि 'टॉयलेट: एक प्रेम कथा' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर दमदार कलेक्शन केले आहे.