सिनेमे फ्लॉप होण्यामागे माझ्याशिवाय...; अक्षय कुमारचा खळबळजनक खुलासा

अक्षयनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 21, 2022, 09:28 AM IST
सिनेमे फ्लॉप होण्यामागे माझ्याशिवाय...; अक्षय कुमारचा खळबळजनक खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. काल म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी खिलाडी कुमारचा आगामी चित्रपट ‘कठपुतली’ (CuttPutlli) चा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर लॉन्चसाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चित्रपटाची संपूर्ण कास्ट म्हणजेच अक्षय कुमार, रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh), सरगुन मेहता (Sargun Mehta), चंद्रचूर सिंग (Chandrachur Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) या कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी अक्षय त्याच्या फ्लॉप चित्रपटांविषयी मोकळेपणानं बोलला. 

आणखी वाचा : 'सेक्रेड गेम्स' पेक्षाही 'या' दाक्षिणात्य वेब सीरिजचा थरार, इंटिमेट सीनही...

या कार्यक्रमादरम्यान अक्षय म्हणाला,'चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगल काम करत नाही, ही आमची चूक आहे. ही माझी चूक आहे. मला बदलावे लागेल. प्रेक्षकांना काय पाहायचे आहे हे मला समजून घ्यावे लागेल. मला माझ्यात बदल करायचे आहेत. मला या गोष्टीवर लक्ष द्यायला हवे की कोणत्या प्रकारचे चित्रपट मी करायला हवे. चित्रपट फ्लॉप होण्याचं कारण मी आहे. माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला दोष द्यायला नको.' 

आणखी वाचा : King Cobra च्या तोंडातून निघाला विषारी साप, ती घटना पाहून नागरिकही झाले थक्का, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर महिला छाटतात स्वत: च बोट! हदरवणारी परंपरा

पुढे अक्षय म्हणाला की, 'हे सर्व लोकांच्या मूडवर अवलंबून असते, कधी कधी एखादी वाईट कॉमेडीही चांगली कमाई करते, कधी कधी चांगला चित्रपटही फ्लॉप होतो, मी माझ्या करिअरमध्ये अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत. त्यामुळे मला वाटतं की हे सर्व माझे प्रेक्षक कोणत्या मूडमध्ये आहेत, यावर अवलंबून आहे.' 

आणखी वाचा : 'माझ्यामुळे भारतीय रेल्वेचं उत्पन्न वाढलं', करीना कपूरचा गजबचा Attitude

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अक्षयचं चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप होत आहेत आणि आत्तापर्यंत त्याचे लागोपाठ 3 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. ‘जॉली एलएलबी ३’, ‘राम सेतू’, ‘कॅप्सूल गिल’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘गोरखा’, सूरराई पोत्तरूचा हिंदी रिमेक, ‘ओह माय गॉड २’ आणि ‘ सेल्फी हे अक्षयचे आगामी चित्रपट आहेत.