मुंबई : अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' हा सिनेमा आणखी एका वादात अडकण्याची शक्यता वाढली आहे, यापूर्वी हा सिनेमा रिलीज होण्याआधी ऑनलाईन लिक झाला होता.येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र आता या सिनेमाची स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप होत आहे, त्यामुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
‘मानिनी’ या शॉर्टफिल्मच्या निर्मात्यांनी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ सिनेमाची कथा चोरल्याचा आरोप केला आहे. त्यातच प्रसिद्ध अभिनेत्री अस्मिती शर्माने अक्षय कुमारच्या सिनेमाची कथा आपल्या ‘गुटरु-गुटर-गूं’मधून चोरल्याचा दावा केला आहे.
28 जुलै रोजीच 'गुटरु-गुटर-गूं'हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण सिनेमा वितरकांनी या सिनेमाची कथा अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ सारखीच असल्याने वितरणास नकार दिला. तसेच अक्षय कुमारचा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच तिने आपला सिनेमा प्रदर्शित करावा', अशी ताकीद दिल्याचा दावा अस्मिती शर्मा यांनी एका वाहिनीशी बोलताना केला आहे.