अक्षय कुमार साकारणार बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद यांचा रोल

बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद यांच्या संघर्षाची कथा आता सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहे. बॉलीवूडमध्ये सध्या खेळाडूंच्या जीवनावर आधारित सिनेमांची चलती आहे. आता बॅडमिंटन कोच पुलेला गोपिचंद यांचाही बायोपिक येणार असल्याचं समजतयं.

Updated: Jun 30, 2017, 09:01 PM IST
अक्षय कुमार साकारणार बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद यांचा रोल title=

मुंबई : बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद यांच्या संघर्षाची कथा आता सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहे. बॉलीवूडमध्ये सध्या खेळाडूंच्या जीवनावर आधारित सिनेमांची चलती आहे. आता बॅडमिंटन कोच पुलेला गोपिचंद यांचाही बायोपिक येणार असल्याचं समजतयं.

याआधी भाग मिल्खा भाग, एम.एस धोनी, सचिन द बिलीयन्स ऑफ ड्रीम, अझर हे सिनेमे आलेत. त्यानंतर आता गोपीचंद यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार आहे.

या सिनेमाची निर्मिती विक्रम मल्होत्रा करणार आहेत. विक्रम मल्होत्रा यांनी एअरलिफ्ट आणि बेबी या दोन्ही सिनेमांचे निर्मिती केली आहे. या दोन्ही सिनेमामध्ये अक्षय कुमार मुख्य अभिनेता होता.

असं सांगितलं जात आहे की, गोपीचंद यांच्या बायोपिकमध्ये अभिनेता अक्षय प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा हिंदी आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे.